23 October 2020

News Flash

करोना काळात पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची चौकशी होणार

क्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अहवाल मागविला

प्राथमिक, माध्यमिकसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अहवाल मागविला

नाशिक : करोना काळात शहरातील अनेक शाळांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना वेठीस धरल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांच्यासह पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रोर केली होती. स्थानिक पातळीवर शिक्षण विभाग आणि पोलीसही दखल घेत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. कडू यांनी शैक्षणिक संस्थांसंबंधीच्या तक्रारीचा सविस्तर अहवाल मागविला आहे.

काही दिवसांपासून शहरातील नाशिक केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स स्कूल, सेंट फ्रान्सिस, होली फ्लॉवर इंग्लिश, सिल्व्हर ओक, विज्डम हाय या शाळांमध्ये शासकीय नियम, अटींचे पालन होत नसल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. संबंधित संस्थांनी मनमानी कारभार करत विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शैक्षणिक संस्थांच्या मुजारीचा पालकांना त्रास सहन करावा लागतो. उपरोक्त शाळांच्या मनमानी विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक), मनपा शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही. शैक्षणिक संस्थांबाबत पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही पोलीस यंत्रणा तक्रार घेत नाही, उलट शाळेशी संगनमत करून पालकांवर बनावट गुन्हे दाखल केले जातात, याकडे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे लक्ष वेधण्यात आले. पालकांच्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, नफेखोर शिक्षण संस्थांना दंड करावा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या लोकसेवकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश सााळुंखे, प्रदीप यादव, सुयश पाटील यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती.

या मागण्यांची दखल घेऊन कडू यांनी शैक्षणिक संस्थांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने  शिक्षण उपसंचालकांनी दोन त्रिसदस्यीय समित्या नेमल्या आहेत. प्राथमिक विभागासाठी वैशाली झनकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिल शहारे आणि संजय खडसे यांची, तर माध्यमिक शाळांसाठी राजीव म्हसकर, सुनीता धनगर आणि संजय खडसे यांची समिती नेमण्यात आली आहे. सात वर्षांत ज्या शाळांनी नियमांचे उल्लंघन केले, त्याची चौकशी समित्यांनी करावी, असे आदेश कडू यांनी दिल्याचे साळुंखे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:18 am

Web Title: investigation of schools for harassing parents during the corona period zws 70
Next Stories
1 ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
2 योजनेला शेतकऱ्यांचा विरोध कायम
3 हरित क्षेत्र विकास योजनेच्या पुढील प्रक्रियेस मान्यता
Just Now!
X