अनिकेत साठे

देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीत राज्यातील दूध वितरण व्यवस्था अडचणीत आली आहे. मुंबईसह नाशिक, औरंगाबाद आणि अन्य शहरांत अनेक दुधविक्री केंद्रे बंद आहेत. मागणी कमालीची घटल्याने जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर अधूनमधून दूध संकलन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शिल्लक दुधाची भुकटी (पावडर) आणि बटरनिर्मिती केली जाते, पण त्यास मर्यादा आल्याचे संघाचे पदाधिकारी सांगतात.

gondia lok sabha seat, Technical Glitch in evm, evm machine, Gondia Polling Station, two Hours Delays Voting, arjuni moragaon, tilli mohgaon, polling news, polling day, gondia polling new
गोंदिया : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण; मतदान प्रक्रिया दोन तास बंद
CSMT station, toilets, passengers at CSMT,
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा
Slow redevelopment of slums in Mulund Bhandup Vikhroli and Ghatkopar
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ईशान्य मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास संथगती
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

दूध, भाजीपाला वा तत्सम जीवनावश्यक, दैनंदिन वस्तूंच्या वाहतुकीस अडथळा नसल्याचे शासकीय पातळीवरून सांगितले जाते; परंतु अनेक ठिकाणी वाहतूक, विक्री आणि वितरण करताना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे जळगाव दूध उत्पादक संघाचे निरीक्षण आहे. एरवी मुंबईहून जळगाव दूध संघाकडे दैनंदिन २० हजार लिटरची मागणी असते. नाशिक, औरंगाबादसह इतर शहरांत जळगावचे दूध जाते. दैनंदिन दोन लाख लिटर दूध पिशवीतून विक्री होते. हे प्रमाण सध्या निम्म्याने कमी होऊन एक लाख लिटरवर आले आहे.

मुंबईला केवळ पाच हजार लिटर दूध पाठविले जाते. टाळेबंदीमुळे स्थानिक पातळीवरील अनेक केंद्रे बंद आहेत. विक्रेत्यांना विक्री करता येत नाही. यामुळे मागणी घटल्याचे संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी सांगितले. महानंदा डेअरीकडून दोन दिवस दूध संकलन बंद राहिले. जळगावमधून महानंदाला दैनंदिन १० हजार लिटर दूध पाठविले जात होते. दूध वाहतूक, वितरण आणि विक्री साखळीत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

करोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत आहे. मागणी ओसरल्याने सोमवारी जळगाव दूध उत्पादक संघाला संकलन बंद ठेवावे लागले, कारण साधारण परिस्थितीत संघ दीड लाख लिटर दूध बटर, भुकटी बनविण्यासाठी प्रक्रिया उद्योगांना देत होता. आज अडीच लाख लिटर दूध त्यासाठी उपलब्ध आहे. शक्य तेवढय़ा दुधाची भुकटी वा बटरनिर्मिती केली जात आहे. या प्रक्रियेची क्षमता संपुष्टात आली. संबंधित उद्योगांमध्ये कामगार नाहीत. तांत्रिक अडचणी उद्भवल्यास दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ मिळत नाही. शिवाय, भुकटीला भविष्यात काय दर मिळेल, याचा अंदाज नसल्याने दूध घेण्यास ते उद्योग रस दाखवत नसल्याचे जळगाव दूध उत्पादक संघाकडून सांगण्यात आले.

दैनंदिन दीड लाख लिटरचा फटका

जळगाव जिल्हा दूध संघ दररोज साडेतीन लाख लिटर दूध संकलन करते. त्यापैकी दोन लाख लिटर पिशवीतून विक्री केले जायचे. दीड लाख लिटर दूध भुकटी बनविण्यासाठी उद्योगांना दिले जात होते. उभयतांची मागणी घटल्याने संघाकडे दररोज दीड लाख लिटर दूध शिल्लक राहते. यामुळे अधूनमधून दूध संकलन बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे संघाचे पदाधिकारी सांगतात. सोमवारी दूध संकलन बंद असले तरी लवकरच ते पुन्हा सुरू होईल. वितरण, विक्री व्यवस्था सुरळीत होण्याकडे संघाचे लक्ष आहे.