युवा पत्रकार, कवयित्री व लेखिका प्रियंका डहाळे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त येथे ११ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ‘एक आठवण.. एक सन्मान’ ही अनोखी स्मरणसंध्या आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात डहाळे यांच्या ‘प्रवास बाकीये’ या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. प्रियंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मित्रपरिवारातर्फे यंदापासून पुरस्कारही देण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्काराने युवा लेखिका व कवयित्री शर्मिष्ठा भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम होईल. गेल्या वर्षी ११ मे रोजी प्रियंका डहाळे यांचा वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. प्रियंका यांनी मराठी चित्रपट, नाटय़ आणि साहित्य क्षेत्राचे वार्ताकन करताना आपला वेगळा ठसा उमटवला. उत्तम पत्रकार, समीक्षक, लेखिका आणि कवयित्री असलेल्या प्रियंका यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. प्रियंकाचे साहित्य आणि पत्रकारितेतील योगदान नेहमीच स्मरणात राहावे म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि प्रियंका डहाळे मित्रपरिवार यांनी साहित्य-कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या एका तरुण पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. ११ मे रोजी प्रियंकाच्या अप्रकाशित ‘प्रवास बाकीये’ या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. तसेच प्रियंकाच्या ‘अनावृत्त रेषा’ या गाजलेल्या काव्यसंग्रहाच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक संजय पवार, समीक्षक विश्राम ढोले, लेखिका प्रा. वृंदा भार्गवे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच, युवा पत्रकाराला देण्यात येणाऱ्या पुरस्काराने लातूर येथील शर्मिष्ठा भोसले यांना सन्मानित करण्यात येईल. अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी