25 February 2021

News Flash

‘खर्डी एक्स्प्रेस रिंकी पावराच्या जिद्दीची कहाणी

सुवर्णपदकापर्यंत मजल मारणाऱ्या खर्डी एक्स्प्रेस रिंकीची ही कथा.

|| अविनाश पाटील

राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास

नाशिक : सातपुड्यातील अतिदुर्गम अशा गावातील आदिवासी मुलगी आपल्या हक्काच्या पदकापासून कोणा एकीच्या वशिल्यामुळे मुकते काय…आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरोधात आपल्या कामगिरीतूनच उत्तर देण्याचा निर्धार करते काय आणि नाशिकला प्रशिक्षणासाठी येऊन आसाममधील गोहाती येथे झालेल्या ३६ व्या राष्टीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविते काय…सर्वकाही एखाद्या चित्रपटासाठी शोभेल असे कथानक. परंतु, हे वास्तव रिंकी धन्या पावरा ही धावपटू जगली आहे. सुवर्णपदकाची मानकरी झालेल्या रिंकीने आपल्या कामगिरीतून अखेर तिच्यावर कधीतरी अन्याय करणाऱ्यांना चपराक दिली. सुवर्णपदकापर्यंत मजल मारणाऱ्या खर्डी एक्स्प्रेस रिंकीची ही कथा.

नाशिक येथील एकलव्य अ‍ॅथलेटिक्स अ‍ॅण्ड स्पोर्टस इन्स्टिट्यूट महिंद्रा कंपनीच्या पाठबळामुळे खेळाडूंना घडवीत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडुंच्या कामगिरीत सुधारणा न झाली तरच नवल. त्यांच्याच प्रशिक्षणाखाली राष्टीय पातळीवर झेप घेतलेल्या रिंकीचे स्वप्न आंतरराष्टीय पातळीवर पदक मिळविण्याचे आहे. नंदुरबारच्या धडगाव या सातपुडा पर्वतरांगेत अतीदुर्गम असे खर्डी (बुद्रुक) हे आदिवासी गाव. लोकसंख्या अवघी ४००-५००. रिंकी याच गावातील. घरात आईवडिल आणि सात भावंड.

कुटुंबाला एक ते दीड एकर पावसाळी शेतीवर वर्षभराची गुजराण करण्याचे दिव्य पेलावे लागते.त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती कशी असेल ते सांगणे नको. गावापासून जवळच असलेल्या रासबर्डी येथील आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत असतांना तालुकास्तरीय शालेय स्पर्धा झाल्या. त्यात दोन किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत रिंकीनेही सहभाग घेतला. शर्यतीत प्रतिस्पध्र्यांपेक्षापुढे असल्याने पदक आपल्यालाच मिळणार या आनंदात ती असतांनाच पदक दुसऱ्या मुलीला दिले गेले. या धक्क्याने एखादी मुलगी खचली असती. रिंकीने मात्र अन्यायामुळे पेटून उठत काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगली. पुन्हा एखादी शर्यत होईल, या आशेने तिने मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरूच ठेवला.

पुढे २५ फे ब्रुवारी २०१८ रोजी त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्त अभियंता झैलसिंग पावरा यांनी सहा किलोमीटरची शर्यत ठेवली होती. शर्यतीत पहिल्या पाच क्र मांकात आल्यास नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयात नंबर लागू शके ल, असे सांगण्यात आले होते. त्यात रिंकी प्रथम आली. आठवीत असतांनाच सिंगापूर येथे होणाऱ्या शर्यतीसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत १० किलोमीटरमध्ये रिंकी प्रथम आली. कागदपत्रांमधील घोळामुळे तीन दिवस उशिराने पारपत्र (पासपोर्ट) मिळाले. आणि तिची सिंगापूर वारी हुकली.झैलसिंग पावरा यांनी साईचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना रिंकीला प्रशिक्षण देण्याची विनंती के ली. त्यासाठी नाशिकच्या भोसला विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या चाचणीत रिंकीने तीन किलोमीटर अंतर ११ मिनिटे सहा सेकं दात पार करून चुणूक दाखवली. त्यामुळे प्रभावित झालेल्या सिंग यांनी रिंकीला नाशिक येथेच थांबण्यास सांगितले. तेव्हांपासून रिंकी नाशिक येथेच सराव करत असून शालेय परीक्षा देण्यास मात्र तिला रासबर्डीला जावे लागते. म्हणजेच शाळा तिकडे आणि सराव इकडे असे तिचे चक्र  सुरू झाले. नाशिक येथे मधुकर कड यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्याचे पाठबळ रिंकीला मिळाले.  अखेर रिंकी नावाचा बोलबाला होणारा दिवस उजाडला. या महिन्यात गोहाती येथे नुकत्याच झालेल्या ३६ व्या राष्टीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रिंकीने तीन हजार मीटरचे अंतर ९:५५:०४ या वेळेत कापून रिंकीने सुवर्ण मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:29 am

Web Title: journey to the gold medal in the national junior athletics championships akp 94
Next Stories
1 दुकानांवर कारवाईचा बडगा
2 मालेगावमधील मालमत्ता सर्वेक्षणास भाजपचा आक्षेप
3 मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात घसरण
Just Now!
X