आपल्या इवल्याशा पावलांनी फिरणाऱ्या बाळकृष्णाला जाब विचारणाऱ्या यशोदा मातेला ‘मैया मोरे मैं नही माखन खायो’ असे लडिवाळ सांगत गोकुळातील सख्यांना आपल्या बासरीने मंत्रमुग्ध करणारा कृष्ण, तर कधी ‘बट सांजेची ढळता ढळता, यमुनेकाठी सजते राधा..सावळ ओठी घुमता पावा, कणकण होते विरते राधा..’ म्हणत प्रेमात आकंठ बुडालेली राधा त्याला भेटण्याची विनंती करतांना यासह कृष्णाची असंख्य रुपे नाशिककरांसमोर कलानंद संस्थेच्या वतीने २९ व ३० एप्रिल रोजी होणाऱ्या ‘कृष्णकथा’ नृत्य कार्यक्रमातून येणार आहेत.
येथील कलानंद नृत्य संस्थेच्या वतीने जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून महाकवी कालिदास कलामंदिरात ‘कृष्णकथा’ या रचनेचे सलग तीन प्रयोग संस्थेच्या वतीने सादर होणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी १२ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० व दुपारी एक या वेळेत हे प्रयोग होतील. कृष्ण हा कथक नृत्याचा आत्मा आहे. कृष्णकथा कीर्तन करत असतांना कथकचा जन्म झाला आहे. श्रीविष्णूच्या या पूर्णावतारी कृष्ण रुपाचे संपूर्ण जीवन अलौकीक व अद््भुत प्रसंगानी नटलेले आहे. कृष्णकथेचा अविभाज्य भाग असलेला ‘गोकुळातील कृष्ण’ या संकल्पनेला मूर्त रुप देत बाळकृष्ण ते यौवनातला गोकुळातील कृष्ण, या कालावधीतील विविध टप्पे, त्याची सर्वाशी असलेली भावनिक जवळीक याचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. शास्त्रीय कथक नृत्याचा कार्यक्रम असला तरी कृष्णाचा खटय़ाळपणा दाखविण्यासाठी काही लोककलांचाही आधार घेण्यात आला आहे. कलानंदच्या ४५ विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांतून ही संकल्पना पूर्णत्वास आली आहे.
नृत्य दिग्दर्शन संचालिका संजीवनी कुलकर्णी व सुमुखी अथनी यांनी केले आहे. संगीतकार प्रशांत महाबळ यांचे संगीत असून स्वरसाज मीना निकम, रागिणी कामतीकर, ज्ञानेश्वर कासार, कल्याणी, गौरी, ईश्वरी व अश्विनी दसककर यांचा आहे. कृष्णकथेमध्ये पारंपरिक रचनेबरोबर नवीन रचनांचा समावेश केला आहे.
रसिकांनी या कलाकृतीचा अवश्य आस्वाद घ्यावा असे आवाहन कलानंदच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६९८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..