07 July 2020

News Flash

भाऊसाहेबच्या लॉकरमध्ये दोन कोटींची सोन्याची नाणी

केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त झाली आहे.

केबीसी घोटाळा प्रकरण

बहुचर्चित केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांचे बँकेतील तीन लॉकर अखेर मंगळवारी उघडण्यात तपास यंत्रणेला यश आले. एका लॉकरची चावी सापडली तर अन्य दोन लॉकर उघडण्यासाठी बँकेकडील चावीचा वापर करावा लागला. दोन लॉकरमध्ये सहा किलो ८०० ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी आढळून आली. त्यांची किंमत तब्बल दोन कोटीहून अधिक असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. उर्वरित लॉकर उघडण्याची कारवाई सुरू आहे.

केबीसीच्या भ्रामक साखळी योजनांद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त झाली आहे. भाऊसाहेब व त्याच्या पत्नीच्या तपासात संबंधितांचे बँकेत तीन नवीन लॉकरची माहिती पुढे आली. या लॉकरची सोमवारी छाननी केली जाणार होती. परंतु, ग्राहकाकडे जी चावी असते, ती न सापडल्याने ते उघडण्याची प्रक्रिया रखडली. अखेरीस एका लॉकरची चावी सापडली तर अन्य दोन बँकांतील लॉकर उघडण्यासाठी बँकेकडील चावीचा वापर करण्यात आला. भाऊसाहेबचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेरी आणि शालिमार येथील शाखेत प्रत्येकी एक तर रविवार कारंजा येथील नगर अर्बन बँकेत लॉकर आहे. तपास यंत्रणेने मंगळवारी त्यांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्यात पहिल्याच लॉकरमध्ये सहा किलो ६०० ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी आढळून आली. दुसऱ्या लॉकरमध्ये सोन्याची २०० ग्रॅम वजनाची नाणी आढळली. या सर्वाचे अंदाजित बाजारमूल्य दोन कोटी रुपये असून ती नाणी जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. उर्वरित एका लॉकरच्या छाननीचे काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 1:32 am

Web Title: kbc scam
टॅग Kbc Scam
Next Stories
1 अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीयकृत प्रवेशाचा आग्रह
2 डॉक्टरची डॉक्टरविरुद्ध फसवणुकीची तक्रार
3 अवकाळी पावसाचा जनावरांवर घाला
Just Now!
X