News Flash

मजुरांच्या वाहतुकीत नियोजनाचा अभाव ; मेधा पाटकर यांची तक्रार

मुंबई, ठाणे, पालघर आणि सभोवतालच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : मजुरांना बसद्वारे परराज्यात सोडतांना चुकीच्या पध्दतीचा अवलंब होत आहे. कोण कुठे जाणार आहे याचा विचार न करता त्यांना सीमेवर सोडले जाते. परिणामी, ज्याला एखाद्या भागात जायचे त्याला वेगळ्याच ठिकाणी सोडले जाते. या प्रक्रियेत नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केली आहे. बसमध्ये २२ ऐवजी ४४ जणांना प्रवास करू दिल्यास अधिक संख्येने मजुरांचा प्रवास होईल, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

मुंबई, ठाणे, पालघर आणि सभोवतालच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. करोनाच्या टाळेबंदीत अडकलेल्या मजुरांनी पायी, सायकल, खासगी वाहने, मालमोटार, टेम्पो अशा मिळेल त्या साधनांनी घरी जाण्यासाठी धडपड केली. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहनने मजुरांच्या वाहतुकीसाठी बसची व्यवस्था केली. नाशिकसह राज्यातून स्थलांतरीत मजुरांना बसने दुसऱ्या राज्याच्या सीमेवर सोडले जात आहे.

या पार्श्वभूमीवर, पाटकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली. मजुरांना सोडतांना त्यांना कुठे जायचे आहे, याचा विचार केला जात नाही. ही पध्दत चुकीची असल्याचे पाटकर यांनी सांगितले. ज्याला बऱ्हाणपूरला जायचे आहे, त्याला इंदूरला जाणाऱ्या रस्त्यावर शिरपूरला सोडले जाते.

मुळात त्यांना रावेरलगतच्या सीमेवर सोडण्याची गरज आहे. परंतु, तसे होत नसल्याने मजुरांना उलट फेरे मारावे लागतील. त्यांच्या अडचणी कमी होणार नाहीत.

तसेच मजुरांना सीमेवर घेऊन जाण्याआधी संबंधित राज्य सरकारशी समन्वय गरजेचा आहे. यामुळे त्या राज्य सरकारने बसची व्यवस्था करून मजुरांना घरापर्यंत जाण्याची व्यवस्था करायला हवी. रेल्वेने गावी निघालेल्या मजुरांना प्रवास मोफत हवा, अशी मागणीही पाटकर यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:08 am

Web Title: lack of planning in migrant workers transportation medha patkar complaint zws 70
Next Stories
1 निवारागृहे शांत शांत..!
2 चार वाहनांच्या अपघातात १७ स्थलांतरित मजूर जखमी
3 राज्य परिवहनच्या मोफत बससेवेचा दोन हजारपेक्षा अधिक स्थलांतरितांना लाभ
Just Now!
X