29 May 2020

News Flash

लासलगाव जळीत प्रकरण; मुख्य संशयितास अटक

गंभीर अवस्थेत असणाऱ्या महिलेला मुंबईच्या मसिना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रेमप्रकरणातून झालेला वाद आणि नंतर अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत गंभीररीत्या भाजलेल्या महिला जळीत प्रकरणातील फरार मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवतला येवला तालुक्यात अटक करण्यात आली.

महिलेचा जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, संशयितांचे म्हणणे यांची उलट पडताळणीचे काम केले जात आहे. गंभीर अवस्थेत असणाऱ्या महिलेला मुंबईच्या मसिना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी लासलगाव बस स्थानक परिसरात ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या जबाबानुसार मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवत याच्याशी तिचे गेल्या महिन्यात लग्न झाले होते.

काही दिवसांपूर्वी रामेश्वरने दुसऱ्या तरुणीबरोबर साखरपुडा झाल्याने उभयतांमध्ये खटले उडाले. लासलगाव बस स्थानकासमोर असाच वाद होऊन दुचाकीत टाकण्यासाठी बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून दोघांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या वेळी पेटविलेली काडी महिलेच्या अंगावर पडल्याने ती गंभीर भाजली. आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन तिला विझविले.

या वेळी संशयित भागवतबरोबर दत्तू जाधव आणि नीलेश कंडाळे हे दोघे जण होते.

पोलिसांनी जाधव, कंडाळेला ताब्यात घेतले. पण, भागवत फरार झाला होता. त्याला येवला तालुक्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे लासलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक खंडेराव रणदिवे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:47 am

Web Title: lasalgaon burning case the main suspect arrested abn 97
Next Stories
1 अडथळे दूर झाल्यास न्यायदान प्रक्रिया जलद
2  सिडको परिसरात कचऱ्याचे ढीग
3 वकील परिषदेत शंभर न्यायाधीशांचा सहभाग
Just Now!
X