News Flash

नाशिकही ‘लेझर’च्या दुनियेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या उद्यानाची संकल्पना मांडली होती

डोलणाऱ्या हत्तींची महाकाय प्रतिकृती.. खुल्या मैदानात सुरू असलेला विलक्षण ‘लेझर शो’.. रंगबेरंगी फुलपाखरांच्या आकारातील बैठक व्यवस्था.. ही वैशिष्टय़े आहेत पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिका आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या जवाहरलाल नेहरू वन उद्यानाची.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या उद्यानाची संकल्पना मांडली होती. त्यातून वनौषधी उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले. या उद्यानाचे वेगळेपण प्रथमदर्शनी लक्षात यावे यासाठी खास भव्य फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक विद्युत रोषणाईची व्यवस्था असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. त्याचा दरवाजाच ४० फुटांचा आहे.   उद्यानात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी फुलपाखरांच्या आकाराची आसन व्यवस्था निसर्गप्रेमींना खुणावते. या उद्यानाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे खुल्या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये दाखविण्यात येणारा ‘लेझर शो’. या कक्षाला ‘कथा अरण्याची’ असे नाव देण्यात आले आहे. देशात व अशिया खंडातही आधुनिक तंत्राचा वापर करून निर्मिलेला हा एकमेव लेझर शो आहे. त्याची कार्यप्रणाली स्वयंचलीत आहे. गर्दीच्या वेळी तो स्वयंचलीत होईल. त्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही.  टाटा ट्रस्ट व महापालिका यांनी उपक्रमांची जबाबदारी घेतली आहे.

बच्चे कंपनीसाठी या ठिकाणी खास हत्तींचे उभयारण्यही साकारले गेले आहे. डोलणाऱ्या सात कृत्रिम हत्तींचा त्यात अंतर्भाव आहे. या ठिकाणी बच्चे कंपनीला हत्तीची माहिती मिळणार आहे. उद्यानात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती असून त्याचे योग्य पध्दतीने जतन करण्यात आले आहे.

नाना, भरत उद्यानाच्या प्रेमात

नावं ठेवायची असतील तर कशालाही ठेवता येतात. परंतु, जे काम चांगले आहे, त्याला चांगलेच म्हणायला हवे असे सांगत नाशिक येथे उभारलेले वनौषधी उद्यान राज्यात कुठेही नसल्याचे प्रशस्तीपत्रक देत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व भरत जाधव यांनी राज ठाकरे यांच्या संकल्पनांचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:19 am

Web Title: laser show in botanical garden in nashik
Next Stories
1 संरक्षण राज्यमंत्र्यांकडून अधिकारी फैलावर
2 रोकडरहित व्यवहारांसाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघची ‘स्वॅप’ यंत्रणा खरेदी
3 पालिकेच्या प्रयोगाने नागरिक संभ्रमात
Just Now!
X