26 January 2021

News Flash

शहीद जवान जाधव यांना अखेरचा निरोप

गेल्या शनिवारी सुटी टाकून घराकडे निघालेले कुलदीप जाधव हे मुक्कामी असलेल्या कारगिल क्षेत्रात सकाळी मृतावस्थेत आढळून आले होते.

बागलाण तालुक्यात शहीद जवान कुलदीप जाधव यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी जमलेला जनसमुदाय. (छाया - नितीन बोरसे, सटाणा)

 

नाशिक : ‘कुलदीप जाधव अमर रहे’चा जयघोष, कुटुंबीयांचा आक्रोश, जवानांनी दिलेली अखेरची सलामी आणि शोक सागरात बुडालेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी साश्रू नयनांनी बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथील शहीद जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

गेल्या शनिवारी सुटी टाकून घराकडे निघालेले कुलदीप जाधव हे मुक्कामी असलेल्या कारगिल क्षेत्रात सकाळी मृतावस्थेत आढळून आले होते. जाधव यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी सटाणा येथे आणण्यात आले. यावेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कुलदीप यांना पुष्पांजली वाहण्यात आली. नंतर ताहाराबाद रस्ता या प्रमुख मार्गाने त्यांच्या भाक्षी रस्त्यावरील राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले. अर्धा तास अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यांच्या घरापासून मूळ गाव पिंगळवाडे येथे वैकुंठ रथावर अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. औंदाणे, तरसाळी, वीरगाव, करंजाड येथील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पिंगळवाडे येथे अंत्ययात्रे वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी कुलदीप जाधव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या जात होत्या. खासदार डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे आदींनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी कुलदीप जाधव यांच्या संपूर्ण परिवाराची वैद्यकीय सेवा आपण मोफत करणार असल्याचे जाहीर केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 12:08 am

Web Title: last message martyr jawan jadhav akp 94
Next Stories
1 नरभक्षक बिबट्या अखेर जाळ्यात
2 जे ऐकिले त्याहुनि रम्य जाणिले…!
3 आरोग्याच्या तक्रारींबाबत डॉक्टरांऐवजी ‘गूगल’ला प्राधान्य
Just Now!
X