16 December 2019

News Flash

मुंबईत नाशिकचा डंका वाजविणार कोण?

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ तर स्टडी सर्कल ‘नॉलेज पार्टनर’ आहेत

स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले.

नाशिक विभागाची आज अंतिम फेरी
विषयातील नावीन्यता व सादरीकरणाच्या भिन्न पद्धतींमुळे प्राथमिक फेरीतच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील नाशिक विभागाची अंतिम फेरी सोमवारी दुपारी ३.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात रंगणार आहे. मुंबई येथील राज्यस्तरीय अंतिम फेरीत नाशिकचा डंका वाजविण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘जाने भी दो यारो’, ‘द परफेक्ट ब्लेंड’, ‘जेनेक्स’ आणि ‘कोलाज्’ या पाचमधून एका एकांकिकेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेसाठी निवड होईल. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ तर स्टडी सर्कल ‘नॉलेज पार्टनर’ आहेत. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले. रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी आहे.
आपल्यातील कलागुण राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक विभागातील १६ संघ प्राथमिक फेरीत उतरले होते. ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर या माध्यमातून नाटय़-चित्र क्षेत्राची कवाडे अधिक मोठय़ा स्वरूपात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली होणार असल्याने प्रत्येक महाविद्यालयाने कसदार सादरीकरण केले. त्यामुळेच अंतिम फेरीसाठी सर्वोत्तम पाच एकांकिका निवडण्यासाठी परीक्षकांचाही कस लागला. निवड झालेल्या पाच एकांकिकांचे विषय तितक्याच ताकदीचे ठरले. के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’मधून समाज माध्यमांची पकड व दुष्परिणाम याकडे लक्ष वेधण्यात आले. तर नाशिकरोडच्या आरंभ महिला महाविद्यालयाच्या ‘कोलाज्’मधून संगीताच्या साहाय्याने हावभाव व हालचालींवर भर देत महिलांवर होणारा अत्याचार आणि त्याचे उत्तर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’मधून आजची तरुणाई आणि जुनी पिढी यांच्यातील वैचारिक दरी दाखविण्यात आली. क. का. वाघ महाविद्यालय नाटय़ विभागाच्या ‘जाने भी दो यारो’ भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईतील अस्वस्थता अधोरेखित करते. न. ब. ठाकूर विधि महाविद्यालयाच्या ‘द परफेक्ट ब्लेंड’मधून नात्यांची भावनिक गुंतवणूक, मानवी भावविश्व यावर वेगळ्या धाटणीने प्रकाश टाकण्यात आला आहे. अशा या एकापेक्षा एक सरस एकांकिकांमधून राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी कोण पात्र ठरणार, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विभागीय फेरीत रंगतदार लढत
’ के.टी.एच.एम. महाविद्यालय-
‘व्हॉट्सअ‍ॅप’
’ क. का. वाघ महाविद्यालयाचा नाटय़ विभाग- ‘जाने भी दो यारो’
’ न. ब. ठाकूर विधि महाविद्यालय- ‘द परफेक्ट ब्लेंड’
’ हं. प्रा. ठा. कला महाविद्यालय-
‘जेनेक्स’
’ बिंदू रामराव देशमुख कला
आणि वाणिज्य महाविद्यालय-
‘कोलाज’.

First Published on October 12, 2015 12:58 am

Web Title: lokankia play at mumbai
Just Now!
X