10 April 2020

News Flash

बदलत्या आर्थिक घडामोडीत गुंतवणुकीचे नियोजन कसे कराल?

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम होईल.

*  उद्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ * शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेत कार्यक्रम

नाशिक : सर्वोच्च टप्प्यानजीक असलेले भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक, स्थिरावलेली मालमत्ता क्षेत्रातील हालचाल, स्वस्त होऊ पाहणारे गृह आदी कर्जाचे व्याजदर, सण-समारंभाच्या तोंडावर मौल्यवान धातूंच्या दरात होणारी उसळी, या पार्श्वभूमीवर, आपल्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, याचे उत्तर ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम गुरुवार, १३ फेब्रुवारी, सायं. पाच वाजता शहर पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात होणार आहे.

शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता नाशिक महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांत ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जाजू तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

कुटुंबाचा नित्य जमा खर्च आणि जीवनातील ठरविलेली मोठी आर्थिक उद्दिष्टय़े आणि स्वप्नांची पूर्ती करीत करबचतही गुंतवणुकीतून साध्य करता येते.

सेवानिवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल, आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचा अधिक परतावा मिळण्याबरोबर पैसे सुरक्षित कसे राहू शकतील, याची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

गुरूवारचा कार्यक्रम पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असून तो विनामूल्य आहे. शुक्रवारचा कार्यक्रम महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आहे.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

कधी ?

गुरुवारी १३ फेब्रुवारी

कुठे ?

भीष्मराज बाम सभागृह, शहर पोलीस मुख्यालय, सायं. पाच वाजता

कधी ?

शुक्रवारी १४ फेब्रुवारी

कुठे ?

तिसऱ्या मजल्यावरील सभागृह, राजीव गांधी भवन, महापालिका मुख्यालय दुपारी चार वाजता

तज्ज्ञ मार्गदर्शक

* गौरव जाजू

* कौस्तुभ जोशी

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी या बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:17 am

Web Title: loksatta arthasatta event in nashik zws 70
Next Stories
1 पेटवून घेतलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
2 संस्था, सोसायटी स्थापून ठेवीदारांची फसवणूक
3 कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी रास्ता रोको
Just Now!
X