25 February 2020

News Flash

महापोर्टलमार्फत होणाऱ्या  परीक्षेविरोधात मोर्चा

महापोर्टलमार्फत होणारी परीक्षा रद्द करण्यात यावी ?

प्रतिनिधिक छायाचित्र

महापोर्टलमार्फत होणारी परीक्षा रद्द करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑनलाइन भरती करावी, सरळसेवा परीक्षा मेगा भरतीतील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात यावीत, आदी मागण्यांसाठी मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर विद्यार्थी आणि तरुणांनी मोर्चा काढला. नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

शासन पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती करणार आहे. ही भरती बंद करून १३ हजार पदांसाठी महापोलीस भरती करावी, तसेच महापोर्टलद्वारे होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये अनेक त्रुटी असून त्यात गैरव्यवहार होतात. त्यामुळे पात्र उमेदवारास नोकरीपासून मुकावे लागते. महापोर्टलवरील परीक्षा बंद करून त्या ‘एमपीएससी’द्वारे घेण्यात याव्यात, असेही या निवेदनात म्हटले आहे.

First Published on September 12, 2019 1:31 am

Web Title: mahapariksha exam mahaonline portal akp 94
Next Stories
1 हजारो वीज ग्राहकांना तडजोडीची संधी
2 ‘मेट्रो निओ’साठी १४६५ कोटी कर्ज स्वरूपात
3 महात्मा फुले आरोग्य योजनेविषयी संबंधितांमधील विसंवादामुळे समस्या
Just Now!
X