News Flash

नोकरीच्या आमिषाने धर्मातराचा संशय ; बहिणीची पोलिसांत तक्रार

गौरव मोहन संधानशिव (२८) हा पदवीधर युवक नोकरीच्या शोधात होता.

नोकरी लावून देतो तसेच काही गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करतो असे सांगत युवकाला फूस लावून अल्पसंख्य धर्मात धर्मातर घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित युवकांशी अद्यापि संपर्क होत नसल्याने पीडित युवकाच्या बहिणीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
येथील कापड बाजार परिसरातील राहणारा गौरव मोहन संधानशिव (२८) हा पदवीधर युवक नोकरीच्या शोधात होता. त्याची गरज ओळखत परिसरातील संशयित रियाज शेखने (२१) त्याच्याशी सलगी वाढविली. साधारणत: सहा महिने संपर्कात राहून कुवेतमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे वारंवार रियाजने गौरवला सांगितले. त्यानुसार रियाजने कुवेतहून त्याला आर्थिक मदत करत नोकरीच्या निमित्ताने कुवेतला बोलावून घेतले. या काळात त्याचे धर्मातर घडविण्यासाठी गौरवला प्रोत्साहन दिले तसेच काही अंशी त्याच्यावर दबावही आणला असे तक्रारीत म्हटले आहे. नोकरी लागल्यानंतर आजपर्यंत गौरवने नातेवाईक किंवा मित्र-परिवारातील कोणाशीही संपर्क साधला नाही. त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्याची बहीण अ‍ॅड. वैशाली कापुरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शेखविरोधात तक्रार दिली. शेखविरुद्ध अपहरणासह अन्य कलमांचा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 4:25 am

Web Title: maharashtra girl alleges religion conversion against job
Next Stories
1 कोरडय़ा गोदापात्रात तुषार सिंचन व्यवस्था; कोपरगावात सोमवारी पुष्कर शाही स्नान
2 शाही मार्गावरून मिरवणूक काढल्याने साधूसंतप्त
3 पोलिसांच्या कार्यपध्दतीविषयी बहुतांश भाविक समाधानी
Just Now!
X