News Flash

नांदगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची भेट

दगाव नगरपालिकेने स्वहिश्शाची चार लाख ७६ हजारांची रक्कम बँकेत जमा केली.

नांदगाव शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुधारणा कामांसाठी २१ लाखांचा निधी वितरित करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या योजनेची एकूण किंमत ४६ लाख २७ हजार असून त्यास शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळणार आहे. त्यातील ५० टक्के हिस्सा शासनाने नगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान राबविले जात असून त्या अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या सर्वव्यापी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने नांदगाव शहर पाणीपुरवठा योजनेच्या ४७.६२ लाख रुपयांच्या सुधारणा कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

ग्राहक संरक्षण, जल लेखापरीक्षण, हायड्रोलिक मॉडेलिंग, जीआयएस मॅपिंग या कामांसाठी २५ लाख ३४ हजार, तर फ्लो मीटर पुरवठा, उभारणी व चाचणी या सुधारणा कामांसाठी १७ लाख ९० हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नांदगाव नगरपालिकेने स्वहिश्शाची चार लाख ७६ हजारांची रक्कम बँकेत जमा केली.

उर्वरित ९० टक्के म्हणजे जवळपास ४२ लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यातील ५० टक्के अर्थात २० लाख ८३ हजारांची रक्कम नगरपालिकेला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नांदगाव हा तसा दुष्काळी भाग. पिण्याच्या पाण्याची केवळ शहर नव्हे तर, ग्रामीण भागातही भ्रांत पडलेली असते. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम शासकीय निधीअभावी रेंगाळले होते. त्यास निधी मिळाल्याने त्यांचा श्रीगणेशा होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 3:54 am

Web Title: maharashtra government to provide funds for nandgaon water supply scheme
Next Stories
1 लक्ष्मीच्या स्वागतासाठी शहर सज्ज
2 ध्वनिमापनासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची तयारी
3 महाराष्ट्र प्राधिकरणाचा निर्णय नाशिकच्या मुळावर आल्याचा आरोप
Just Now!
X