प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कुस्तीतील महाराष्ट्र केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने नाशिकमध्ये प्रथमच आली. या पाश्र्वभूमीवर, महापालिकेने हर्षवर्धनच्या नागरी सत्कारासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडून हर्षवर्धनला आर्थिक निधी देण्याबरोबर स्वच्छता मोहिमेत ‘सदिच्छा दूत’ म्हणून त्याची नियुक्ती करण्याची मागणी पुढे आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने बाजी मारली. भगूरच्या नगसिंगराव बलकवडे व्यायामशाळेत वयाच्या ११ व्या वर्षांपासून हर्षवर्धनने कुस्तीचे डावपेच शिकले आहेत. महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी हर्षवर्धन यांचा नागरी सत्कार आयोजित करण्याबाबत बैठक झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी सभापती उद्धव निमसे, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांच्यासह क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
andhshraddha nirmulan samiti latest news in marathi
नाशिक: महाराष्ट्र अंनिसतर्फे देहदान, अवयवदान सप्ताह
Sanjay raut on prakash ambedkar
वंचितने ठाकरे गटाबरोबरची युती तोडली, संजय राऊत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे…”

२८ जानेवारी हा सत्कार करण्याचा मानस आहे. महापालिकेने नाशिकच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. त्या अनुषंगाने नागरी सत्कारावेळी हर्षवर्धनला ११ लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी खैरे यांनी केली आहे. हर्षवर्धनला निधी देण्याविषयी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनही अनुकूल आहे. महापौर चषक आणि हर्षवर्धनला द्यावयाचा निधी याविषयी २० जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे.  स्वच्छता अभियानात पंचतारांकित मानांकनासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. या मोहिमेसाठी हर्षवर्धनला सदिच्छा दूत करता येईल. जेणेकरून या मोहिमेला चालना देता येईल, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्याचा विचार सुरू आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत चर्चा झालेले विषय समोर आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. नागरी सत्कारासाठी जागा निश्चितीवर चर्चा झाली. महाकवी कालिदास कलामंदिरात हा सोहळा आयोजित करण्यावर चर्चा झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रित करायचे आणि त्यांची वेळ घेण्याच्या दृष्टीने नियोजन क्रीडा विभागाने करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. या कार्यक्रमाच्या नियोजनात विविध क्रीडा संघटना, शिक्षण संस्था, मनपा शाळा, शहरातील सर्व तालीम संघ तसेच विविध संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे.