16 December 2017

News Flash

धक्कादायक! चेष्टा केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालून तरुणाची हत्या

नाशिकमधील घटना

नाशिक | Updated: August 11, 2017 12:22 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

चेष्टा केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालून तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. शहरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चेष्टा केल्याचा रागातून दोन तरुणांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, त्यामध्ये आरोपी कैलास शेजुळ याने विशाल प्रकाश झाल्टे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात प्रकाशचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी कैलासला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल प्रकाश झाल्टे (वय २३, रा. पंचशीलनगर) याच्यावर कैलास शेजुळ (वय ३५, रा. पंचशीलनगर) याने कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची माहिती घेतली.

First Published on August 11, 2017 11:25 am

Web Title: man killed for objecting to youth misbehaving in nashik