लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मराठा समाजाच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह विधान के ल्याप्रकरणी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेल्या तकारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी जिल्हा मराठा क्रोंती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून ठिय्या दिला.

सदावर्ते यांनी चर्चेच्या एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा मराठा क्रोंती मोर्चाने केला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दय़ावर आक्र मक होऊनही अविचारी भूमिका घेत नसतांना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य के ल्याने सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा मराठा क्रोंती मोर्चाने के ली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले. या वेळी सरकारवाडा पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्तालयाबाहेरही मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा मराठा क्रोंती मोर्चाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले.