09 August 2020

News Flash

मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून झालेल्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून झालेल्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणी गावात रमेश जाधव कुटुंबासमवेत राहतात. पत्नी सविता (३६) हिला शेतीचे काम येत नाही, या कारणावरून रमेश याचा पत्नीशी सातत्याने वाद होत असे. सोमवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. त्या वेळी रमेशने सविताला जबर मारहाण केली. छातीला मार बसल्याने गंभीर दुखापत झाली. नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना रात्री सविताचा मृत्यू झाला. या प्रकरणी सविताच्या माहेरच्या मंडळींनी संशयित रमेशविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 12:39 am

Web Title: marriage women death in beating abn 97
Next Stories
1 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा १० हजार युवकांना लाभ
2 कलावंत घडविणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा
3 कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा
Just Now!
X