‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अधिक कठोर करावा, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करावी, मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे यासह विविध १० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दलित, आदिवासी अ‍ॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्या वतीने शनिवारी शहरात भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवती, महिला, आबालवृद्ध मोठय़ा संख्येने सहभागी झाले.

[jwplayer psUg1N0g]

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
Nagpur Holi
नागपुरात होळीत मद्यपींचा रस्त्यावर हैदोस; दोघांचा मृत्यू, शंभरावर…

सकाळपासून ग्रामीण व शहरातील विविध भागातून वाहनांचे जत्थे मोर्चास्थळी येत होते. मोर्चासाठी जिल्हा कारागृहाजवळ मंडप उभारणीसह वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मोर्चामुळे शहरातील विविध शाळांना या दिवशी सुटी देण्यात आली. शहरातील बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. अग्रभागी सजविलेल्या रथावर भारतीय संविधानाची भव्य प्रतिकृती ठेवण्यात आली. त्यापाठोपाठ महिला व मुली, वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पुरुष, राजकीय नेते व कार्यकर्ते या क्रमाने समाजबांधव सहभागी झाले. विविध मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. निळ्या झेंडय़ांमुळे शहर निळेमय झाले. हजारोंचा जनसमुदाय शांतपणे निघाला. बसस्थानक, पोलीस कवायत मैदान, बारा पत्थरकडून आग्रा रस्त्याने मनपा चौक, झाशी राणी पुतळा, गुरुशिष्य स्मारक, डॉ. घोगरे चौक (बाफना शाळा) मार्गे येऊन मोर्चाचा जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ समारोप करण्यात आला.

या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावरून युवतींनी भाषणात मोर्चा मागील भूमिका मांडली.

सात युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, दलित-आदिवासींवर झालेल्या अत्याचाराचे सामाजिक ऑडिट करून श्वेतपत्रिका काढावी, मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण न देता स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे, नाशिक जिल्ह्य़ातील दलित अत्याचाराची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्यांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. महामोर्चात मुस्लीम, मातंग, चर्मकार, भोई समाज, आदिवासी, महादेव व मल्हार कोळी समाज समन्वय समिती, मुस्लीम एकता मंडळ असे विविध समाज घटक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांना पाणी वितरण करण्यात आले. वैद्यकीय पथकही कार्यरत होते. महामोर्चा बसस्थानक आवारातून निघणार असल्याने सकाळपासून एसटी बसची वाहतूक स्थानकाच्या मागील बाजूने वळविण्यात आली. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

[jwplayer voXexKMV]