‘हॉटेल व्यवस्थापन’चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सहभाग

नाशिक : शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांत दादा हिरे इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयातर्फे शनिवार आणि रविवारी फुडिस्तान’ खाद्य महोत्सव महाविद्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात खवय्यांना विनामूल्य प्रवेश आहे.

New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम

महोत्सवाचे आकर्षण म्हणजे ‘मटका बिर्याणी’ची चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे. हा महोत्सव सायंकाळी सात ते रात्री साडेदहा या वेळेत खुला राहणार असून या खाद्य महोत्सवाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज मोकाळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, आपल्या कामाचे मूल्यमापन करता यावे यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘फुडिस्तान’ हा खाद्य महोत्सव दरवर्षी भरविण्यात येतो. महोत्सवाच्या आयोजनापासून महोत्सवात कुठले खाद्यपदार्थ असतील, त्याची तयारी, ते बनविणे, त्या पदार्थाची विक्री, महोत्सवाचे आर्थिक नियोजन ही सर्व धुरा विद्यार्थी सांभाळतात.

महाविद्यालयामध्ये महिन्यापासून महोत्सवाचे नियोजन सुरू आहे. यासाठी हॉटेल मॅनेजमेंटचे १२० विद्यार्थी आणि प्राध्यापक वेगवेगळ्या कामांत गुंतलेले आहेत. महोत्सवाचे वेगळेपण जपण्यासाठी महाविद्यालय दरवर्षी नव्या संकल्पनेवर काम करत असते. यंदाही सर्वत्र सहज उपलब्ध होणाऱ्या ‘बिर्याणी’वर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेषकरून शाकाहारी आणि मांसाहारी मटका बिर्याणी हे या खाद्य महोत्सवाचे विशेष आकर्षण असून जागतिक दर्जाची बिर्याणीची चव खवय्यांना चाखता येणार आहे. सोबतच संगीत, विविध मॉकटेल्स आणि रंगीबेरंगी सजावटीचा आनंद घेता येणार आहे.