26 February 2021

News Flash

बीडमधील शेतकऱ्याच्या मुलीची ‘उडान’!

शिक्षणशास्त्रातील पदविका प्राप्त केल्यानंतर खरे तर तिला शिक्षिका व्हायचे होते.

सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेली मिना तुपे आईसह. (छाया : मयूर बारगजे)

मीना तुपे यंदाची सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक; खडतर कष्टातून स्वप्न साकारले
शिक्षणशास्त्रातील पदविका प्राप्त केल्यानंतर खरे तर तिला शिक्षिका व्हायचे होते. मात्र, पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिने निर्णय बदलला. ती हवालदार झाली. परंतु या पदावर तिचे मन रमेना. त्यामुळे तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात ती थेट दुसरी आली. लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीचे प्रशिक्षण तिला खडतर भासले नाही. ७४८ प्रशिक्षणार्थीना मागे टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या १०९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेने सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला. बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा येथील मीना भिमसिंग तुपे हिने आपल्या कामगिरीने इतिहास रचला.
येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षणात विविध विषयांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना वेगवेगळ्या चषकाने गौरविले जाते. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सवरेत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचे सुवर्णपदक व चषक प्राप्त करणारी मिना तुपे यंदाच्या तुकडीत सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरली. प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणारी ती पहिलीच महिला. शेतकरी कुटुंबातील मिना आई-वडिलांना शेतीच्या कामात सर्व प्रकारची मदत करते. चार एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकटच आहे. मुलींनी फार शिकण्याची गरज नाही असे आईचे म्हणणे. त्यामुळे तिच्या एका बहिणीने इयत्ता चौथीत तर अन्य बहिणीने इयत्ता आठवीत असताना शाळा सोडली. परंतु, मिनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला.
ट्रॅक्टरने नांगरणी करण्यापासून ते इतरांच्या शेतात जाऊन काम करून तिने शिक्षण पूर्ण केले. शिक्षणशास्त्र पदविकेचे शिक्षण घेऊन शिक्षिका होण्याचा तिचा मानस होता. परंतु, याच सुमारास म्हणजे २०१० मध्ये बीड जिल्’ाातील भरतीत दाखल होऊन ती पोलीस हवालदार झाली. स्पर्धा परीक्षेसाठीच्या अविश्रांत मेहनतीने उपनिरीक्षक बनलेल्या मुलीचा सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून झालेला गौरव पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना काय बोलावे हे देखील समजत नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:15 am

Web Title: meena tupe awarded best cadet of the year
Next Stories
1 ‘एसएफआय’चे आजपासून राज्यस्तरीय अभ्यास शिबीर
2 पुण्याहून आणलेल्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण
3 नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना वीज दरात सवलतीचा मार्ग खुला
Just Now!
X