News Flash

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

भाजपचे आमदार आणि पोलिसांचीदेखील उपस्थिती

दाऊद इब्राहिम (संग्रहित छायाचित्र)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये १९ मे रोजी पार पडलेल्या लग्न समारंभात गिरीश महाजन उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे या जंगी विवाह सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह बुकी आणि अन्य मान्यवर मंडळींसह पोलिसांनी हजेरी लावली. त्यामुळे या प्रकरणी नेमकी कोणावर कोणती कारवाई केली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या व्हिडिओ क्लिप्स आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीने बुधवारी दाखवल्या होत्या. नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे महाजन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्याच्या समोरील अडचणी निर्माण झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या समारंभाला पोलीसदेखील उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याचीदेखील नाचक्की झाली आहे.

वाचा- दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नातील हजेरी पोलिसांना महागात

दाऊद इब्राहिमच्या पत्नीच्या भाचीच्या विवाह सोहळ्याला गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक आमदार उपस्थित होते. याबद्दल गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुलीचे काका शाहर खातेब यांनी लग्नाचे आमंत्रण दिले होते. खातेब नाशिकमधील धार्मिक नेते असून ते आरोग्य विभागाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. मात्र ते दाऊदचे नातेवाईक आहेत, याबद्दल मला कल्पना नव्हती,’ असे महाजन यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:08 pm

Web Title: minister girish mahajan attends wedding of gangster dawoods relative in nashik
Next Stories
1 मालेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी
2 शेतकरी संपासाठी जनजागृती
3 इमारतींवरील झाडांच्या पुनरेपणासाठी ‘ट्री रेस्क्यू’
Just Now!
X