11 December 2017

News Flash

दिंडोरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दिंडोरी येथे अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून संशयिताने अत्याचार केला.

प्रतिनिधी, नाशिक | Updated: March 31, 2016 1:11 AM

दिंडोरी येथे अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून संशयिताने अत्याचार केला. चांदवड येथे रोडरोमिओने शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संशयिताने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिंडोरी येथील इंदिरानगर परिसरात वयोवृद्ध महिला वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या महिलेसमवेत त्यांची १० वर्षांची नात वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या नीलेश ऊर्फ सोन्या संजय बोगे (१९ गिरणारे) याने घरात कोणी नाही हे पाहून अल्पवयीन मुलीला गोळ्या व चॉकलेटचे आमिष दाखविले. तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा सर्व प्रकार आजीला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी दिंडोरी ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित नीलेशला अटक केली. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना चांदवड तालुक्यात घडली. लासलगांव फाटा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची परिसरातील युवक शाळेत जात येत असताना त्याने सलगी करण्याचा प्रयत्न केला. त्यास तिने विरोध केला असता विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

First Published on March 31, 2016 1:11 am

Web Title: minor girl molested in dindori