04 March 2021

News Flash

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

काझीमळा येथे राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील काझीमळा येथे राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काझीमळा येथे हिरामण माळेकर कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी उज्ज्वला (१७) हिचे पिंपरखेड येथील रमेश धात्रक सोबत प्रेमसंबंध होते. रमेशने उज्ज्वलाचा मानसिक छळ करून समाजात तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिल्याने या सर्व प्रकाराला कंटाळून तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला. या प्रकाराविरोधात माळेकर यांनी संशयिताविरुद्ध अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात एका सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याने गोरख मुकणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:50 am

Web Title: minor girl suicide due to love affair
Next Stories
1 तोडग्यासाठी सरकारची धावपळ
2 दिंडोरीत सिलिंडरचा स्फोट, चौघांचा होरपळून मृत्यू
3 नाशिक ते मुंबई मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली
Just Now!
X