नाशिक : करोना संसर्गामुळे जिल्ह्य़ातील खासगी शिकवणीवर्ग १५ महिन्यांपासून बंद असल्याने त्यासंबंधीत संचालक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांचे आर्थिक नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांना वेतन सुरू असतांना खासगी शिकवणी वर्गाचे शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा खासगी शिकवणीवर्ग संचालक संघटनेच्या वतीने मंगळवारी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महाविद्यालयांमधील शिक्षकांना नियमित वेतन सुरु आहे. सरकारने मॉल, मंगल कार्यालये, दुकाने आणि खासगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु, व्यावसायिक असूनही शासनाने अद्याप खासगी शिकवणी वर्गाना परवानगी न दिल्याने संचालकांची आर्थिक होरपळ होत आहे. ऑनलाईन शिकविणे समजत नसल्याने वर्ग सुरु करावेत, अशी  नववी ते १२ वी, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षा देणा?ऱ्या विद्यार्थ्यांंची आणि पालकांची मागणी आहे. करोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करावयास तयार असून कमी विद्यार्थी संख्येने का होईना, खासगी शिकवणीवर्ग सुरु करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करण्यात आले. शहरासह जिल्ह्यतील बहुतांश खासगी शिकवणीवर्ग संचालक यावेळी उपस्थित होते.

अनेक खासगी शिकवणीवर्ग संचालक शिक्षकांचे करोनाने निधन झाले. काहींनी आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली. काहींचे कर्जबाजारीपण, उपासमारीने प्रचंड हाल होत आहेत. सरकार काही मदतही करत नाही. अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित के ला आहे. पुणे, नागपूर, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यंनी खासगी शिकवणी वर्गाना परवानग्या दिल्या ?असताना नाशिकलाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले आदी उपस्थित होते.