नाशिक : मुंबई येथील दृष्टीहीन युवक अजय ललवाणी हा मुंबई ते गोंदिया आणि गोंदिया ते मुंबई या २०१० किलोमीटरच्या प्रवासास सायकलने निघाला असून गोदिंयाहून परतीचा प्रवास करतांना अजय नाशिक येथे आला असता नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. मुंबई ते गोंदिया आणि गोंदिया ते मुंबई हा २०१० किलोमीटरचा प्रवास १२ दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय अजयने बाळगले आहे. त्यासाठी ११ मित्रांनी त्याला मदत के ली आहे.

या साहसी सायकल मोहिमेला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून सुरुवात झाली. दररोज सुमारे १७० किलोमीटर सायकल चालवत नऊ तारखेला तो गोंदिया येथे पोहोचला. गोंदियाहून पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास करत तो सोमवारी नाशिक येथे पोहचला.  सकाळी ११ वाजता मुंबई नाका येथे नाशिक सायकलिस्टच्या वतीने अजयचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक सायकलिस्टच्या सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, संजय पवार, सुरेश डोंगरे, ऐश्वर्या वाघ आदी उपस्थित होते.

अजय हा जन्मापासून अंध आहे. अपंग हे सर्वसामान्यांच्या तुलनेत कोणत्याही बाबतीत कमी नाही हे अजयला दाखवून द्यायचे आहे, असे डॉ. रौेदळ यांनी सांगितले.