22 September 2019

News Flash

आर्थिक वादातून खून

शयमाने पैसे देण्यास नकार दिल्याने बसवराजने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले

प्रतिनिधीक छायाचित्र

मनमाड येथे पैसे परत करण्याच्या वादाचे पर्यावसन खूनात झाले. घटनेनंतर संशयित फरार असून या संदर्भात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कर्नाटकातील संशयित बसवराज पवार (रा.रायचूर) हा खूनाच्या गुन्ह्य़ात यादगीर कारागृहात शिक्षा भोगत होता. बसवराज यास कारागृहातून सोडविण्यासाठी संशयित पवारच्या पत्नीने सध्या नांदगाव येथे राहणाऱ्या शयमा पवार (५०, रा. वर्धा) यास १० हजार रुपये दिले. संशयित कारागृहाबाहेर आल्यावर आपले १० हजार रुपये परत घेण्यासाठी तो मनमाड-नांदगाव रस्त्यावरील वस्तीत गेला. त्यावेळी शयमा आणि बसवराज यांच्यात पैशांवरून वाद झाला.

शयमाने पैसे देण्यास नकार दिल्याने बसवराजने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यात शयमाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर बसवराज फरार झाला.

First Published on September 6, 2019 3:46 am

Web Title: murder from financial arguments akp 94