14 August 2020

News Flash

आर्थिक वादातून युवकाचा खून

स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी शहराच्या सातपूर परिसरातून संशयित संदिप सोनवणे याला ताब्यात घेतले.

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक :  सिन्नर ते नाशिक दरम्यान महामार्गावरील मोहदरी घाट परिसरात वन उद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी ३८ वर्षांच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या मृतदेहाची ओळख पटवित तो खून असल्याचा उलगडा झाला असून पोलिसांनी संशयित संदिप सोनवणे (२६) याला ताब्यात घेतले आहे.

नाशिक येथील अशोक महाजन (३८) हा औद्योगिक वसाहत परिसरातील कंपन्यांमध्ये रंगकामाचे काम करत असे. १७ जुलै रोजी सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरात तो पैसे घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर मोहदरी घाटात त्याचा खून झाल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी शहराच्या सातपूर परिसरातून संशयित संदिप सोनवणे याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता खूनाचा उलगडा झाला. १७ जुलै रोजी अशोक आणि संशयित संदिप हे अशोकच्या कामाचे पैसे घेण्यासाठी सिन्नर येथे गेले होते. तेथून परत येत असतांना ७०० रुपये उसने पैसे घेण्यावरून संदिपचा अशोकशी वाद झाला.

या वादात अशोकच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची कबुली संदिपने दिली. संदिपने अशोकच्या खिशातील १८ हजार रुपये काढून घेतले. संशयिताला सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:07 am

Web Title: murder of a youth over a financial dispute zws 70
Next Stories
1 नाशिक विभागात ४० लाखांपेक्षा अधिक क्विंटल कापूस खरेदी
2 आढावा बैठकीतील आक्षेप अमान्य
3 कामगारांच्या प्रश्नांवर मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक
Just Now!
X