नांदगाव

शहरातील मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर ओढ दिलेल्या पावसासाठी विशेष नमाज पठण केले. मौलाना मुफ्ती इमाम यांनी मार्गदर्शन केले.

सकाळी एक तासाहून अधिक वेळ  चाललेल्या या प्रार्थनेप्रसंगी अकिल मौलाना, मुफ्ती फईम यांचा  समावेश होता. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन महिन्यानंतरही शहर आणि परिसरात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण हवालदिल झाले आहेत. जनावरांना पाणी आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘नमाजे इस्तेसकाह’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुफ्ती फईम यांनी दिली. आपल्या आयुष्यातील अनेक चुका अल्लाहसमोर मांडत आम्हाला चूक मान्य आहे. चुका झाल्या असतील त्या आम्ही कबूल करतो. आम्हाला माफ कराल आणि पाऊस पाडाल, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.