26 November 2020

News Flash

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी आजपासून सुरू

पर्यटकांनी सामाजिक अंतर नियमांचे पालन, मुखपट्टीचा वापर हे पथ्य बंधनकारक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

नाशिक : करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले  नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य शुक्रवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. थंडीची तीव्रता कमी अधिक होत असताना देश विदेशातील पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली असून अभयारण्य पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे गजबजले आहे. करोना महामारीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अभयारण्य बंद होते.

माणसांची वर्दळ पूर्णपणे थांबल्याचा परिणाम पक्ष्यांचा किलबिलाट वाढण्यात झाला. पक्ष्यांना हक्काची शांतता मिळाली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर देशविदेशातील पक्ष्यांनीही अभयारण्य परिसरात हजेरी लावण्यास सुरुवात के ली आहे. सध्या १० हजारांहून अधिक पक्ष्यांचा मुक्काम असून पुढील महिन्यात पक्ष्यांची संख्या अधिक वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शासनाच्या निर्णयानुसार अभयारण्य खुले होत आहे. पर्यटकांनी सामाजिक अंतर नियमांचे पालन, मुखपट्टीचा वापर हे पथ्य बंधनकारक आहे. पर्यटकांनी सोबत सॅनिटायझर ठेवावे, पर्यटकांचे थर्मल स्क्रि निंग होणार असून यामध्ये ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ही ९५ पेक्षा कमी तसेच तापमान ३८ अंश सेल्सियस ते १००.४ पेक्षा जास्त असेल, त्यांना अभयारण्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. करोनासदृश लक्षणे आढळल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:46 am

Web Title: nandur madhameshwar bird sanctuary starting today tourists akp 94
Next Stories
1 पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बनावट लाभार्थ्यांना वसुलीसाठी नोटीस
2 बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी बालिके चा अखेर मृत्यू
3 नाशिक जिल्ह्य़ाच्या स्वच्छता कार्यक्रमाला दाद
Just Now!
X