25 February 2021

News Flash

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात १७ हजारपेक्षा अधिक पक्ष्यांची नोंद  

परिणामी हिवाळ्यात मुक्कामी आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढविला आहे.

९६१ पाणपक्षी, ५ हजार ६५६ झाडांवरील पक्षी आढळले 

नाशिक : रामसर हा विशेष दर्जा प्राप्त झालेल्या महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या ‘नांदुरमध्यमेश्वर’ पक्षी अभयारण्यात मागील वर्षांच्या तुलनेत पक्ष्यांचा मुक्काम वाढला आहे. अभयारण्य परिसरात केलेल्या गणनेत ११ हजार ९६१ पाणपक्षी, पाच हजार ६५६ झाडांवरील आणि गवताळ पक्षी अशा १७ हजार ६०७ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. अभयारण्याचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापन दिनाचे औचित्य साधत पक्षीगणना करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्याने नांदुरमध्यमेश्वर धरण परिसरात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. परिणामी हिवाळ्यात मुक्कामी आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढविला आहे. मंगळवारी वन विभागाच्या वतीने अभयारण्य परिसरात वन अधिकारी, कर्मचारी, पक्षिमित्र, स्थानिक मार्गदर्शक, वन्यजीव अभ्यासक यांच्या मदतीने पक्षीगणना करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कुरूडगाव, काथरगाव या पाच ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात आले. यामध्ये पाणपक्षी आणि झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

या प्रगणनेत वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, ब्राह्मणी बदक, कापशी बदक, कॉमन पोचार्ड, विजन, लिटल क्रेक, बेलन्स क्रेक, स्पूनबिल, रिव्हर टर्न, नकटा बदक, टफ्टेड पोचार्ड, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाटय़ा, कॉमन क्रेन आणि मोठय़ा संख्येत गुलाबी मैना पक्षी आढळून आले.

अभयारण्याच्या चिरंतन विकासासाठी लोकसहभागातून रोजगाराभिमुख पर्यटन विकास आणि ग्रामविकास ही संकल्पना राबविली जात आहे. तसेच वनसंरक्षण आणि वन्यजीव संवर्धन यांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील आहे. गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करून वनांवरचे, संरक्षित क्षेत्रावरचे अवलंबित्व कमी करणे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे साहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी अभयारण्यातील पुढील उपक्रम आणि अडीअडचणी याविषयी चर्चा केली. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, वनरक्षक अश्विनी पाटील, नेचर क्लब ऑफ नाशिकचे प्रा. आनंद बोरा आदी उपस्थित होते.

पक्षी अभयारण्यात रेस्क्यू बोट

नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात धरण परिसरात पक्षी जखमी झाला, मासेमारीच्या जाळ्यात अडकला तर त्याला तातडीने मदत मिळावी यासाठी रेस्क्यू बोट आणण्यात आली आहे. ही बोट पक्ष्यांच्या मदतीसाठी कार्यरत राहील. तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठी ग्रीन जीम तयार करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:11 am

Web Title: nandurbar bird forest seventeen bird thousand registration akp 94
Next Stories
1 शिवसेनेकडून भाजपची कोंडी
2 पत्नीचा खून करून सैन्यदलातील जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
3 माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार ; मालेगाव येथील घटना
Just Now!
X