महापालिका-सिडको यांच्यातील करार कारणीभूत

शहराच्या सिडको परिसरातील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय दुपारी वाचनालयाच्या विश्वस्त मंडळास किंवा कार्यालयास पूर्वसूचना न देता कुलूपबंद करण्यात आले. या कारवाईमुळे सुर्वे यांना मिळालेल्या महत्वपूर्ण पुरस्कारांचा ठेवा असलेले ‘कलादालन’ ही बंदिस्त झाले आहे. सिडको प्रशासन व महानगरपालिका यांच्यातील करारामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी यासंदर्भात विश्वस्त मंडळाला पूर्वसूचना देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया वाचनालयाने व्यक्त केली आहे.

husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
mumbai gujarati language board marathi news
मुंबई: स्वा. सावरकर उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, संस्थेला महापालिकेची नोटीस

१९९८ मध्ये सिंहस्थ नगरात मायको फोरमच्या वास्तुत कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय सुरू करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे यांचा वाचनालयाशी परिचय आणि स्नेह वृध्दींगत झाल्यानंतर वाचनालयासाठी महापालिकेने स्वतहून २००५ मध्ये कामटवाडे परिसरातील आम्रपाली लॉन्सजवळील जागा फोरमला दिली. पाच वर्षांपूर्वी सिंहस्थ नगर परिसरातून वाचनालयाने आपला मुक्काम या वास्तुत हलवला. वाचनालयात सुर्वे यांनी आपल्या साहित्य संपदेसह आपल्याला मिळालेले मानसन्मान, पुरस्कार वाचनालयाकडे सुपूर्द केले. त्यामध्ये पद्मश्री, मध्यप्रदेश सरकारकडून दिलेला कबीर पुरस्कार, साहित्य संमेलनाचे स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. नाशिककरांसह साहित्यप्रेमींना हा अमूल्य नजराणा पाहता यावा यासाठी  वाचनालयाने ‘कलादालन’ सुरू केले. या सर्वाचे महत्व लक्षात घेता या ठिकाणी सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ हा अनोखा प्रकल्प आकारास आणण्याची विश्वस्तांची तयारी सुरू होती. महिला, युवक, कामगार वर्ग डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टिने विविध उपक्रमांची आखणी या माध्यमातून करणे सुरू झाले. वाचनालयाच्या आवारात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी छोटी अभ्यासिका आहे. बचत गटातील महिला या ठिकाणी आपले गृहोद्योग करतात. वाचनालयात सुर्वे यांची संपूर्ण साहित्य संपदा एका छताखाली असल्याने शोध प्रबंधासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची येथे ये-जा सुरू असते. शुक्रवारी वाचनालयाचे दैनंदिन व्यवहार सुरू असतांना दुपारच्या सुमारास सिडको प्रशासकीय कार्यालयाचे पथक वाचनालयाच्या आवारात आले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसह खुल्या वाचनालयातील ज्येष्ठ नागरिक, बचत गटाच्या महिला स्वयंपाक करत असतांना त्यांना बाहेर काढण्यात आले. सिडको प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वाचनालयास कुलूप लावण्यात आले. विश्वस्त राजू देसले यांनी यावर सुरूवातीला एप्रिल फूल असावे असे आम्हाला वाटल्याची प्रतिक्रिया दिली. सायंकाळी विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्यात याविषयी चर्चा सुरू होती.

या सर्व नाटय़मय घडामोडीसाठी सिडको प्रशासन व नाशिक महानगरपालिका यांच्यात सहाव्या योजने संदर्भातील करार कारणीभूत आहे. करारामध्ये सहावी योजना सिडकोकडून महानगरपालिकेला हस्तांतरीत करत असतांना काही रक्कम देणे अपेक्षित होते. मात्र, सिडको प्रशासन ही देणी देण्यात अपयशी ठरले. थकबाकी वसुलीसाठी सिडको येथील क्रॉम्पटन ग्रीव्हजचा हॉल, सुर्वे वाचनालय यासह काही जागा, इमारती या महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत सिडको प्रशासकीय अधिकारी कांचन बोधले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.