04 August 2020

News Flash

नाशिकमध्ये धक्कादायक घटना; आईला कोरोना झाला म्हणून २३ वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

आईला करोना झाला म्हणून एका २३ वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आईला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मुलगा नैराशात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर मुलानं नैराश्यातून घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. शुक्रवारी मध्यरात्री नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे ही धक्कादायक घटना घडली.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांमुळे लोक चिंतेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन ते तीन दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांसमवेत नाशिकचा दौरा करणार आहेत.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ६१५ जणांना करोनाची बाधा झाली तर सहा जणांनाही बळी गेला. बाधितांत नाशिक मनपा हद्दीतील ४०७ रुग्णांचा समावेश आहे. महानगरातील ५ जणांसह ग्रामीणमधील एक अशा ६ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३७१ वर पोहोचली आहे. नाशिक महानगराने प्रथमच एकाच दिवसात झालेल्या बाधितांमध्ये ४००चा आकडा ओलांडला, तर नाशिक ग्रामीणमध्ये १५१, मालेगावचे ७ आणि जिल्हाबाह्य ४३ जणांना बाधा झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ७३९ वर पोहोचली आहे.

लॉकडाउनविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय
शहरात पुन्हा लॉकडाउनची मागणी होत आहे. काही घटकांनी स्वयंस्फुर्तीने लॉकडाउन केला. परंतु, त्यातून काही हाती लागले नाही. लॉकडाउनच्या विरोधात आपली भूमिका नाही. सर्वाना सोबत घेऊन काम करण्यावर आपला भर आहे. दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 8:24 am

Web Title: nashik 23 year boy sucide due to mother dedacte coronavirus positive nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना आढावासाठी मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा
2 Maharashtra class 12 results 2020 : नाशिक विभागाचा १२ वी निकाल ८८.८७ टक्के
3 रूंग्टा कन्याशाळेत नीला सत्यनारायण यांच्या आठवणींना उजाळा
Just Now!
X