नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित मुले जखमी आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते. ही घटना नाशिकमधील इंदिरा नगर भागातील जॉगिग ट्रॅकजवळ घडली. विशाल पवार (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे.
ही सर्व मुले नाशिकमधील वडाळा गावात राहत होती. पहाटे तीनच्या सुमारस ते कालिका देवीच्या दर्शनसाठी घरातून पायी निघाले होते. इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकजवळ आल्यानंतर मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात विशाल पवारचा जागीच मृत्यू झाला.
जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातील माहिती अपघातग्रस्त मुलांच्या नातेवाईकांना समजल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. धडक दिलेल्या पोलीस शोध घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2018 10:26 am