08 March 2021

News Flash

नाशिकच्या कलाकारांची वेबमालिका ‘टिक टॅक टो’

शहरपरिसरातील निसर्गस्थळे, स्थानिक कलावंतांना बरोबर घेऊन चित्रीकरण

शहरपरिसरातील निसर्गस्थळे, स्थानिक कलावंतांना बरोबर घेऊन चित्रीकरण

नाशिक : टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. कला क्षेत्रही यास अपवाद नाही. परंतु, सक्तीने मिळालेल्या या विश्रांतीचा सर्जनात्मक कलाविष्कारासाठी येथील दिग्दर्शक प्रवीण काळोखे यांनी उपयोग करून घेतला. शहर परिसरातील निसर्गस्थळे, स्थानिक कलावंतांना सोबत घेत टिक टॅक टो ही वेबमालिका तयार के ली आहे. चित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या कामगिरीची चुणूक दाखविणारी नाशिकची मंडळी आता वेबमालिके कडे वळली आहेत.

दिग्दर्शक काळोखे यांचा रंगभूमीवरील वावर सर्वश्रुत आहे. टाळेबंदीत अधिक लोकप्रिय झालेल्या वेबमालिकांचे क्षेत्र त्यांना खुणावत होते. हे आव्हान काळोखे यांनी लीलया पेलले. हेमंत बेळे यांची कथा, पटकथा आणि संवादातून आजच्या तरुणाईची प्रेमाकडे बघण्याची वेगळीच आणि भन्नाट गोष्ट त्यांनी वेब मालिके तून मांडली आहे. शहराजवळील गंगापूर धरण परिसरातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इमारतीसह शहराच्या इतर भागात वेबमालिके चे चित्रीकरण करण्यात आले.

चित्रीकरणास सुरुवात करण्याआधी कलाकार आणि तंत्रज्ञ यांची कार्यशाळा घेतली. त्यात सर्व काही समजावून सांगण्यात आले. त्याचा काम अचूक करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी उपयोग झाला. अर्चना पाटील आणि रोहित पाटील यांनी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषा ललित कु लकर्णी यांची आहे. संगीत डी. मुसे, संपादन नीलेश गावंड, साहाय्यक दिग्दर्शक निषाद वाघ आदींनी आपआपली जबाबदारी सांभाळली. चित्रपटात नाशिकचा चिन्मय उदगीरकर, तेजस बर्वे, मयूरी कापडणे, अक्षता सामंत, प्रथमेश जाधव, कल्पेश पाटील, कु णाल पाटील यांनी काम के ले आहे. याशिवाय चंद्रकांत कु लकर्णी, आनंद इंगळे, जयती भाटिया, निशिगंधा वाड यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:02 am

Web Title: nashik artists marathi web series tic tac toe zws 70
Next Stories
1 आजपासून दुकाने, मद्यालये, हॉटेल सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत खुली
2 उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
3 गाडीने पेट घेतल्याने शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
Just Now!
X