News Flash

नाशिक-बेळगाव विमानंसेवेला सुरुवात

आठवडय़ातून तीन दिवस विमान सेवा

ओझर येथील विमानतळावरून नाशिक-बेळगाव विमानसेवेला सुरूवात झाली. याप्रसंगी महिला प्रवाशासह पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे आणि स्टार एअर कं पनीचे अधिकारी उपस्थित होते.

आठवडय़ातून तीन दिवस विमान सेवा

नाशिक : देशातील प्रमुख शहरांशी नाशिकला हवाई सेवेने जोडण्याच्या शृंखलेत आता कर्नाटक राज्यातील बेळगावचाही समावेश झाला आहे. सोमवारी स्टार एअर या कंपनीच्या वतीने नाशिक ते बेळगाव ही थेट विमान सेवा सुरू करण्यात आली. तिचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे आदींच्या उपस्थितीत झाले.

या विमान सेवेमुळे ५८० किलोमीटरचे अंतर तासाभरात पूर्ण करता येईल. आठवडय़ातून तीन दिवस ही विमान सेवा असेल. उडान योजनेंतर्गत १९९९ रुपयांत प्रवास करता येणार आहे. उडान योजनेंतर्गत नाशिक दिल्लीबरोबर देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले जात आहे.

या विमान सेवेने उत्तर कर्नाटकशी ते जोडले जाणार आहे. सध्या नाशिक-बेळगाव प्रवासासाठी रस्तेमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. ५८० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ११ ते १२ तासांचा कालावधी लागतो. हे अंतर आता केवळ एका तासावर येईल. स्टार एअर सेवेसाठी एम्ब्राएर विमानांचा वापर करते. मोठय़ा विमानांसारखी मोकळी जागा, आरामदायी आणि वेगवान सुरक्षित प्रवासाची अनुभूती या विमानातून मिळणार असल्याकडे कंपनीने लक्ष वेधले. नाशिक-बेळगाव विमान सेवा कार्यान्वित झाल्यानंतर पुढे ती आणखी कोणत्या शहरापर्यंत विस्तारता येईल याचा विचार केला जाणार आहे. नाशिक-बेळगाव विमान सेवेमुळे बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी तसेच गोवा या ठिकाणी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. या विमान सेवेमुळे दोन्ही राज्यांतील व्यापार, उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नाशिक ते बेळगाव ही विमान सेवा सोमवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवडय़ातून तीन दिवस राहील. बेळगावहून दुपारी ४.४० वाजता विमान नाशिककडे उड्डाण करेल. नाशिक-बेळगाव विमान सायंकाळी सव्वा सहा वाजता मार्गस्थ होईल.

५० आसनांचे विमान या सेवेसाठी वापरले जात आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:07 am

Web Title: nashik belgaum flight service started zws 70
Next Stories
1 वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू
2 प्राणवायूच्या टाक्या भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव रद्द
3 महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मित्रपक्षांची धास्ती
Just Now!
X