News Flash

जगप्रसिद्ध ‘रॅम’ सायकलिंग स्पर्धेत नाशिककरांनी फडकावली विजयी पताका

अमेरिकेच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंतचा ३००० मैलांचा खडतर प्रवास

Nashik bicycle racers win Race across america competition : अमेरिकेच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंतचा ३००० मैलांचा खडतर प्रवास सायकलवरून पूर्ण करताना स्पर्धकांचा कस लागत असतो.

जगातील अत्यंत अवघड मानली जाणारी  ‘रेस अक्रॉस अमेरिका’ म्हणजेच ‘रॅम’. या सायकलिंग स्पर्धेत नाशिकच्या ‘सह्याद्री’ आणि ‘श्रीनिवास’ या दोन संघांनी अभूतपूर्व यश मिळवले होते. हे दोन्ही संघ आज नाशिकमध्ये परतले. त्यावेळी नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे त्यांचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.
अमेरिकेच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंतचा ३००० मैलांचा खडतर प्रवास सायकलवरून पूर्ण करताना स्पर्धकांचा कस लागत असतो. त्यात नाशिकच्या कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक (सोलो) गटात ११ दिवस १८ तास ४५ मिनिटात ही शर्यत पूर्ण केली आहे. ते आपल्या गटात सातव्या क्रमांकावर राहिले. तर टीम सह्याद्रीने रिले प्रकारात स्पर्धेत उतरताना ४ जणांच्या संघाने केवळ ८ दिवस १० तास आणि १६ मिनिटात ही शर्यत पूर्ण केली आहे. लेफ्टनंट कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ आणि टीम सह्याद्रीचे डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील आणि पंकज मारलेशा या सर्व विजेत्यांची ढोल ताशाच्या गजरात नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. नाशिकच्या क्रीडाप्रेमींनी सर्व विजेत्यांचे जल्लोषात स्वागत केले.  नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन या बंधूंनी यापूर्वी ही रॅम स्पर्धा पूर्ण करत नाशिकचे नाव उज्ज्व केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 10:57 pm

Web Title: nashik bicycle racers win race across america competition ram
Next Stories
1 ‘समृद्धी’मुळे जिल्ह्य़ातील ३४७ बांधकामे बाधित होणार
2 व्यापाऱ्यांसह गुंतवणूकदारांसाठी जीएसटी अनुकूल
3 गॅस तपासणीचा नाहक भरुदड
Just Now!
X