सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित छबू नागरे याचा फरार साथीदार अखेर पोलिसांचा हाती लागला आहे. कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५ रा. रुद्राक्ष सोसायटीचे बाजूला कामगार नगर, सातपूर औद्योगिक वसाहत) यास आडगाव पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी बनावट नोटा व त्यासाठी वापरण्यात आलेला कागद तज्ज्ञांच्या तपासणीसाठी नोटप्रेसकडे पाठविण्यात येणार आहे. या नोटा बनविण्यात तांत्रिकदृष्ट्या सजग असलेला कृष्णा अग्रवाल याचा शोध पोलीस काही दिवसांपासून घेत होते. खास नोटा बनविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती असलेला अग्रवाल नागरे याच्याकडे कामाला होता. यासाठी त्याला मोठी रसद तो पुरवत होता. नागरेच्या सांगण्यानुसार हव्या तितक्या किंमतीच्या नोटा तो बनवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
K Kavitha Arrested By CBI
के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देढिया यांनी आरोपी संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा अग्रवाल यांना एक दिवसांची पोलीस कोठडी तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट नोटा स्कॅन करण्यासाठी व बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या मुळ हजार व पाचशेच्या नोटांचा पोलीस शोध घेत होते. या नोटा छापण्यासाठी मागवलेला कागद व छापलेल्या नोटा नाशिकरोड येथील नोटप्रेसकडे पाठविण्यात येणार असून तेथील तज्ज्ञांची मदत पोलीस घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.