२७ ते ३० जून दरम्यान चाचणी

नाशिक : महापालिके च्या शहर बस सेवेचे घोंगडे भिजत राहिल्याने निर्बंध शिथील होऊनही नागरिकांसमोरील प्रवासाची समस्या कायम असल्यावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी तातडीने बैठक घेऊन एक जुलैपासून ही बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. २७ ते ३० जून या कालावधीत शहर बस सेवेची चाचणी घेण्यात येणार आहे. तत्पुर्वी, अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.

महापालिका शहर बस सेवा सुरू करीत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने शहरातील सेवेतून अंग काढून घेतले. पालिके ची बस सेवा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे निर्बंध शिथील होऊनही नागरिकांसमोरील प्रवाशांच्या समस्या कायम राहिल्या. मनपाची बससेवा सुरू करण्याची मागे तारीखही जाहीर झाली होती. पण, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तो विषय स्थगित ठेवला गेला.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने बस सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बैठक घेऊन बस स्थानक, चालकांचे प्रशिक्षण, त्यांचे गणवेश, तिकीट यंत्र, मनुष्यबळ, अ‍ॅप आदींचा आढावा घेतला. नंतर महानगर परिवहन महामंडळ कंपनीची बैठक झाली. यामध्ये बस सेवा सुरू करण्याच्या तयारीवर चर्चा झाली. प्रादेशिक परिवहन विभागाने मनपा हद्दीसह २० किलोमीटरच्या अंतरापर्यंत १४६ मार्गावर टप्पा वाहतुकीस परवानगी दिली आहे. तिकीट दरासही मान्यता मिळाली. बससेवेची बहुतांश तयारी झाली असली तरी २५ जूनपर्यंत शिल्लक राहिलेल्या सर्व बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना आयुक्त जाधव यांनी के ली. दरम्यान, महापालिकेने मागील वर्षी कंपनी स्थापन करून बस सेवा सुरू करण्याची तयारी केली होती. करोनामुळे तो विषय लांबणीवर पडला होता. दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर निर्बंध शिथील झाले. परंतु, राज्य परिवहनची सेवा बंद असल्याने नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्या प्रवासासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. संबंधितांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी होते. राज्य परिवहनची सेवा बंद आणि महापालिकेची बस सेवा सुरू होत नसल्याने नागरिक कोंडीत सापडले होते.