29 November 2020

News Flash

नाशिक-दिल्ली विमान सेवा २५ सप्टेंबरपासून

नाशिक-दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नाशिक : नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी दिल्ली विमानतळावर वेळ मिळण्यास (टाइम स्लॉट) लवकरच नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळणार आहे. यामुळे ही सेवा सुरू होण्यातील मोठा अडथळा दूर होणार असून येत्या २५ सप्टेंबरपासून नाशिक-दिल्ली विमानसेवेला सुरुवात होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक-दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. नाशिकहून इतर शहरांसाठी सुरू झालेल्या विमान सेवांना फारसा प्रतिसाद मिळालेला नसताना दिल्लीसाठी नाशिककरांनी दाखविलेल्या उत्साहामुळे ही सेवा स्थिरस्थावर होण्याची अपेक्षा वाढली होती. त्यातच जेट एअरवेज कंपनी डबघाईस आल्यामुळे ही सेवा बंद झाली होती.

अन्य विमान कंपनीने ही सेवा चालवावी यासाठी पाठपुरावा झाल्यानंतर उडाण योजनेंतर्गत इंडिगो कंपनीला नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. २५ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. या माध्यमातून नाशिक पुन्हा देशाच्या राजधानीशी हवाईमार्गे जोडले जाईल. या सेवेची तारीख जाहीर झाली असली तरी विमानास उड्डाण, उतरण्यास दिल्ली विमानतळावर वेळ मिळणे आवश्यक ठरते. इंडिगो कंपनीने त्यासाठी उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. दिल्ली विमानतळावर लवकरच ही वेळ दिली जाणार असल्याचे मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 4:13 am

Web Title: nashik delhi flight service since from september 25 zws 70
Next Stories
1 बहुतांश नाल्यांवर अनधिकृत बांधकामे
2 वाहनांची रखडपट्टी कायम
3 लाखो भाविकांची ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा
Just Now!
X