छगन भुजबळ यांचा पाय आणखी खोलात

नाशिक-मुंबई रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या अशोका बिल्डकॉनने भुजबळ फाऊंडेशनला दिलेल्या कोटय़वधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी या कंपनीच्या मुख्यालयासह संचालकांचे निवासस्थान आणि पिंपळगाव बसवंतच्या येथील टोल नाक्यावर छापे टाकले. सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू होती.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
thane police, 417 criminals
ठाणे पोलिसांची ‘ऑलआऊट’ मोहीम, चार तासांत ४१७ गुन्हेगारांची झाडाझडती; मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

अशोका बिल्डकॉन आणि भुजबळ फाऊंडेशन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकासमवेत आयकर विभागाचेही अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी खा. किरीट सोमय्या यांनी अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांचे भुजबळांशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप केले होते. भुजबळ फार्म येथे बांधलेल्या महालासाठी अशोका बिल्डकॉनने कोटय़वधींची रक्कम भुजबळ फाऊंडेशनला दिली. त्या मोबदल्यात भुजबळांनी अशोकाला नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मिळवून दिल्याची तक्रार त्यांनी केली होती. या व्यवहारातील ४० कोटींच्या बँक खात्यातील दस्तावेज सोमय्या यांनी सादर केले होते. अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबियांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी विमानाने परदेशात नेले होते. या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.