एबी फॉर्मधील घोळामुळे शिवसेनेच्या १० उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. या उमेदवारांना आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हटले जाणार आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या एबी फॉर्ममधील चुका टाळण्यासाठी काही जणांनी या फॉर्मची झेरॉक्स कॉपी भरण्याची चूक केली. फॉर्म भरताना झालेल्या या घोळामुळे शिवसेनेला १० उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे. शिवसेना पक्षाचे सचिव खा. अनिल देसाई यांनी यासंदर्भात निवडणूक अधिका-यांची भेटही घेतली.

Dhairyasheel Mohite Patil
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली!, शरद पवार गटात जाणं जवळपास निश्चित, माढ्यात घडामोडींना वेग
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप

प्रभाग क्रमांक २९ मधून दीपक बडगुजर आणि भूषण देवरे यांच्याऐवजी अरविंद शेळके, सतीश खैरनार हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेचीच सत्ता येणार आहे. नाशिककर सुज्ञ असून सेनेलाच मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  सध्या सोशल मीडियावरील भाजप संबंधित व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर बोलताना देसाई म्हणाले, सध्या भाजपचं नातं आणि सख्य केवळ ‘देवाण घेवाणी’शीच आहे. नवे महाभारत घडवणाऱ्यांचे राजकारण त्यांनाच लाभो असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.