News Flash

रस्ते अपघात रोखण्यासाठी मुक्त विद्यापीठासह ‘नाशिक फर्स्ट’चा पुढाकार

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

आजपासून ऑनलाइन अभ्यासक्रम

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण, त्यात होणारी जीवितहानी हे टाळण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ आणि अ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशन नाशिक फर्स्ट संस्थेच्या वतीने रस्ते वाहतूक आणि सुरक्षा या विषयावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

गुरूवारी दुपारी १२.३० वाजता मुंबई नाका येथील नाशिक फर्स्ट संस्थेच्या आवारात या शिक्षणक्र माचे उद्घाटन होणार आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असतांना अपघाताची मालिका सुरू आहे.

वर्षभरात जिल्हा परिसरात एक हजार ६११ अपघात झाले असून ९३५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दुचाकीस्वरांच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. अपघाताची मालिका खंडित व्हावी तसेच वाहनचालकाला सुरक्षित वाहन कसे चालवता

येऊ शके ल याची माहिती मिळावी यासाठी नाशिक फर्स्ट आणि मुक्त विद्यापीठ संस्थेने पुढाकार घेतला आहे. कॉमन वेल्थ ऑफ लर्निग या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने हा अभ्यासक्र म विकसित करण्यात आला आहे.

सर्व प्रकारच्या वाहनचालकांसाठी माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे. शिक्षणक्र मामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रस्ता वाहतुकीचे महत्त्व, चालकांची गुणवैशिष्टय़े, वाहन चालवतांना घ्यावयाची काळजी, सामाजिक बांधिलकीचे सखोल ज्ञान याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच,चालकांची वर्तणूक आणि कर्तव्ये, वाहन कागदपत्रे, रस्त्यांवरील वाहन नियमांचे कायदे, इंधन वाचविण्याच्या सुचना, आवाज आणि हवेच्या प्रदूषणाचे परिणाम, व्यक्तीअंतर्गत कौशल्य आणि जनसंपर्क, वाहन ओलांडण्याचे अतिवेगाचे परिणाम आदीची माहिती दिली जाणार आहे.

अनेक वाहनधारक नियमांची पुरेपूर माहिती नसतांनाही वाहन रस्त्यावर आणत असतात. अशा वाहनधारकांकडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तसेच बहुतेक जण वाहन चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेताच महामार्गावर वाहन चालविण्याचे धाडस करतात. त्यांचे हे धाडस त्यांच्यासह इतरांच्या जीवितासाठीही धोक्याचे असते. रस्ता अपघात रोखण्यासाठी त्यामुळेच शास्त्रीयदृष्टय़ा परिपूर्ण अशा अभ्यासक्र माची गरज निर्माण झाली . ती गरज या अभ्यासक्र मामुळे भरून निघणार आहे. गुरुवारी या अभ्यासक्र मास आरंभ होणार असून प्रशिक्षण अभ्यासक्र माचा कालावधी सहा महिन्याचा आहे.

मराठी माध्यमातून ही माहिती दिली जाणार असून आठवी उत्तीर्ण या प्रशिक्षणास पात्र आहे. नागरिकांनी सुरक्षित वाहन चालविण्यासाठी अभ्यासक्र मास प्रवेश घ्यावा, असे आवाहन नाशिक फर्स्ट आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:01 am

Web Title: nashik first took imitative to stop road accident dd 70
Next Stories
1 संमेलनाआधी नामांतराचा खेळ
2 बॉम्बसदृश वस्तूमुळे पोलिसांची धावपळ
3 करोनाचा कहर : शाळा बंद, पण खासगी शिकवण्या, वरिष्ठ महाविद्यालये सुरू
Just Now!
X