नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याने पाच वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तारुखेडले शिवारातील एका मळ्यावर राखणदार म्हणून काम करणारे अशोक हांडगे यांच्या चिमुरडीवर बिबट्याने हा हल्ला केला. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. अशोक हांडगे यांची पाच वर्षाची मुलगी गुड्डी ही शेतालगत असलेल्या घराबाहेर खेळत होती. यावेळी ऊसाच्या शेतामधून अचानक समोर आलेल्या बिबट्याने गुड्डीवर झडप घालून तिला पकडले व शेतामध्ये फरफटत नेले. आपली मुलगी दिसत नाही म्हणून तिच्या आई-वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील गावकऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या व टॉर्च घेऊन शेताच्या दिशेने धाव घेतली. तासभर संपूर्ण शेतात गावकऱ्यांनी गुड्डीचा शोध घेतल्यानंतर मृतावस्थेत ती आढळून आली. गुड्डीची अवस्था बघून सर्वांच्याच अंगावर शहारे आले होते.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

घटनेची माहिती मिळताच येवला वन विभागाचे वनरक्षक विजय तेकणकर, भय्या शेख व भारत माळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ऊस शेतामध्ये बिबट्यांचा संचार वाढला असून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यांना रोखण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न होत असले तरी देखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. संध्याकाळनंतर गावकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.