News Flash

राज्य शूटिंगबॉल स्पर्धेत नाशिकला सलग तिसरे विजेतेपद

सोलापूर येथे आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या महिलांनी सलग तिसरे विजेतेपद मिळविले.

राज्य शूटिंगबॉल स्पर्धेत नाशिकला सलग तिसरे विजेतेपद
राज्य शुटिंगबॉल स्पर्धेत सलग तीसरे विजेतेपद मिळविणारा नाशिकचा महिला संघ

अंतिम सामन्यात अहमदनगर संघाचा पराभव

सोलापूर येथे आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या महिलांनी सलग तिसरे विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या पायल शर्मा, आचल सोनावणे, कल्याणी देवरे आणि प्रांजळ काकळीज यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय ठेवत अहमदनगर संघावर वर्चस्व राखले. हा अंतिम सामना नाशिकने १५-१२, १५-१३ असा सरळ दोन सेटमध्ये जिंकला. त्याआधी नाशिकने उपांत्य फेरीत सांगलीला आणि साखळीत औरंगाबाद, जालना संघांना पराभूत केले. विजेतेपद मिळविणाऱ्या संघातील पायल, आचल, कल्याणी आणि प्रांजल हे चारही खेळाडू नांदगाव येथील नूतन जिमखाना क्लबचे आहेत.

या खेळाडूंना शुटिंग बॉलचे राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक आणि संघटक बाळासाहेब थोरात यांचे  अनेक वर्षांपासून मार्गदर्शन मिळत आहे. याआधीही नाशिकच्या महिलांनी जालना आणि परभणी येथे झालेल्या दोन राज्य स्पर्धेचेही  विजेतेपद मिळविले आहे.

या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे नाशिकच्या पायल शर्माची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. आचल, कल्याणी आणि प्रांजल यांचीही महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिकच्या या चारही खेळाडू डिसेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 2:40 am

Web Title: nashik gets third consecutive title in the state shooting ball tournament
Next Stories
1 माथाडींच्या संपाची शेतकऱ्यांना झळ
2 धावण्यात ‘उडान’, तर ‘स्वच्छ भारत’ ची कुस्ती
3 डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत नाशिक सायकलपटूंची चमक
Just Now!
X