News Flash

नाशिकमध्ये करोना संशयित महिलेचा मृत्यू; नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

तिघांना अटक

नाशिकमध्ये करोना संशयित महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नाशिकमधील अंबड लिंक रोडवरील एका खासगी (ग्लोबल हॉस्पिटल) रुग्णालयात महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईक व मित्र मंडळींनी रूग्णालयाची तोडफोड करून एका डॉक्टरला मारहाण केली . या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.

या रुग्णालयात चार दिवसांपूर्वी महिला रुग्ण दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. महिला रुग्ण करोनाबाधित होती की नाही याबाबत स्पष्टता झालेली नाही. अनामत म्हणून भरलेले पैसे देखील डॉक्टरांनी परत केले नाही. यावरून मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 11:53 am

Web Title: nashik hospital doctor coronavirus pationt relative beaten doctor nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वाढीव वीज देयकांविरोधात पदयात्रा
2 राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी नाशिकहून जल, माती रवाना
3 टपाल विभागाच्या अडचणींचा ‘शिक्षण संक्रमण’ ला फटका
Just Now!
X