चारुशीला कुलकर्णी

टाळेबंदीने आर्थिक संकट ओढवले असताना काही गंभीर स्वरूपांचे सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. यातील एक म्हणजे कुमारी माता आणि अनाथ बालके. जिल्ह्यत या वर्षी सप्टेंबर अखेपर्यंत एकूण १७ बालके आधाराश्रमात दाखल झाली असून त्यातील सात ही कुमारी मातांच्या त्यागपत्रातील आहेत. ओळखीच्या लोकांकडून अल्पवयीन मुलींची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत असून दुसरीकडे जन्मानंतर बालकांच्या भाळी अनाथाचा शिक्का बसत आहे.

करोनाकाळात अनेकांच्या हातातील रोजगार गेला.  काही घरून काम करत असल्याने घरी अडकले आहेत. या काळात आर्थिक विवंचनेसह वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या वतीने १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह साजरा होणार आहे.

या सप्ताहानिमित्त शासनाच्या तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दत्तक प्रबोधनाविषयी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आधार आश्रमात तसेच बालगृहात दाखल होणारी बालके  हे पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी , बस, रेल्वे स्थानकात सापडलेली असतात. तसेच काही बालके  ही कु मारी मातांच्या त्यागपत्रातून आलेली आहेत. याविषयी आधार आश्रमातील दत्तक प्रक्रि या समन्वयक राहुल जाधव यांनी माहिती दिली. दत्तक विधान प्रक्रि येविषयी नागरिकांमध्ये अनभिज्ञता आहे. दिवसाला पाचहून अधिक कुटूंबे चौकशीसाठी येतात. वर्षांला २५-३०  बालके  ही त्यागपत्राद्वारे दाखल होतात. तीन वर्षांत कुमारी मातांचे प्रमाण वाढले आहे. २०१८ या वर्षांत जिल्ह्य़ातील ४१ बालके  संस्थेत दाखल झाली. त्यातील १५ बालके  त्यागपत्रातून आली. २०१९ मध्येही १५ बालके  त्यागपत्राच्या आधारे संस्थेत दाखल झाली.

२०२० मध्ये पहिल्या सात महिन्यांत सात बालके ही त्यागपत्रातून आली आहेत. सद्य:स्थितीत वेगवेगळ्या रुग्णालयांमधून कु मारी मातांसाठी विचारणा होत आहे. विशेषत: १३ ते १५ वयोगटातील बालिकांचे प्रमाण अधिक असल्याचे जाधव यांनी सांगितले. कु मारी माता असल्याने भविष्याचा विचार करता जन्माला आलेल्या बाळाला आईसह त्याच्या अन्य नातेवाईकांकडून अव्हेरले जाते. त्याच्याशी संबध तोडत संस्था किंवा अन्य ठिकाणी त्याला सोडून देण्यात येते. यामुळे बालकांच्या नशिबी जन्मापासून अनाथ हा शिक्का बसत आहे.

बदनामीपोटी बालके रस्त्यावर

कुमारी माता या बहुतांश फसविल्या गेलेल्या आहेत. ओळखीच्या लोकांकडून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा प्रकार होत आहे. यातील पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजनांची माहिती नसल्याने कुमारी मातांचे प्रश्न गंभीर होत असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. आपली बदनामी होईल तसेच शासनाकडून काही मदत मिळवण्यासाठी धडपड करण्यासाठी कु टुंबीय उत्सुक नाही. परिणामी कुमारी मातांचे बालक सुरक्षितरीत्या संस्थेत दाखल होण्याऐवजी रस्त्यावर किं वा अन्य ठिकाणी बेवारस स्थितीत आढळत आहे. कुमारी मातांच्या प्रश्नांविषयी सजग होणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी नमूद केले.