News Flash

खंदकात लागलेल्या आगीत नाशिकच्या जवानाचा मृत्यू

स्वप्निल रौंदळ हे २०१६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल झाले होते.

नाशिक : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील जवान स्वप्निल रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला. खंदकात आग लागून ही दुर्दैवी घटना घडली. जवान शहीद झाल्याने गावात एकाही घरावर गुढी उभारली गेली नाही. स्वप्निल रौंदळ हे २०१६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल झाले होते. पहिली नियुक्ती राजस्थानात मिळाली. नुकतीच त्यांची उधमपूर येथे नेमणूक झाली होती. याठिकाणी त्यांचे सेवाअंतर्गत प्रशिक्षण सुरू होते. या प्रशिक्षणादरम्यान मंगळवारी पहाटे खंदकात आग लागली. या आगीत चार जवान होरपळून गंभीर जखमी झाले. स्वप्निल ९० टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वप्निल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ  आणि बहीण असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:16 am

Web Title: nashik jawan dies in trench fire zws 70
Next Stories
1 करोना चाचणीचे अहवाल प्रलंबित
2 दैनंदिन गरज भागवून ५० ते ६५ मेट्रिक टन प्राणवायू शिल्लक
3 मनमाड करोना केंद्रासाठी तहसील कार्यालयात आंदोलन
Just Now!
X