राज्य अ‍ॅथलेटिक्स निवड चाचणी

नाशिक : नाशिकची धावपटू कोमल जगदाळेने येथे आयोजित राज्य अ‍ॅथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेत तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. याशिवाय नाशिकच्याच दिनेशने १० हजार मीटर धावण्यात सुवर्ण तसेच महिलांच्या ४०० मीटर धावण्यात ताई बामणेने रौप्यपदक मिळविले. पतियाळा येथे२५ ते २९ जून या कालावधीत ६०वी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. पुढील महिन्यात २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निवड होण्यासाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्रा धरण्यात येणार आहे.

त्यासाठी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची निवड नाशिक येथे आयोजित स्पर्धेतून करण्यात येणार आहे. पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात निवड चाचणी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राज्यातून आलेल्या सर्वच खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन के ले. सध्या करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या संपूर्ण नियमांचे पालन करून या निवड चाचणीच्या  वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता १०,००० हजार मीटर धावणे शर्यतीला सुरुवात झाली.

नाशिकच्या दिनेशने सुवर्णपदक तर, रोहित यादवने रौप्यपदक पटकावले. ३००० मीटर अडथळा शर्यतीत नाशिकच्या कोमल जगदाळेने सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक निवडीसाठीची आशा जिवंत ठेवली आहे. १०,००० हजार मीटर धावण्यात निकिता राऊत आणि  प्राजक्ता गोडबोले यांनी अनुक्र मे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. ४०० मीटर धावण्यात यमुना लाडकातने सुवर्ण तर, नाशिकच्या ताई बामणेने रौप्यपदक मिळविले. पुरुषांच्या १०० मीटर धावण्यात सौरभ  निकमने सुवर्ण, करण भोसलेने रौप्य तर, अक्षय खोतने कांस्य मिळविले.

गुरुवारी सकाळी सहा वाजता पुन्हा काही स्पर्धा होणार आहेत. त्यात ५,००० मीटर धावणे, लांब उडी, २०० मीटर धावणे, भाला फेक, हातोडा फेक, उंच उडी,  ११० मीटर , १०० मीटर अडथळा, ८०० मीटर धावणे शर्यत होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.